शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेठअहमदपूर-किन्हाळा मार्गावरील सुरू पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:47 IST

कामासाठी मातीमिश्रीत वाळू, डस्टचा वापर : संबंधित अधिकाऱ्यांचेही होतेय दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद): तालुक्यातील पेठअहमदपूर-किन्हाळा मार्गावर एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सदर कामात विना रॉयल्टी वर्धा नदीच्या माती मिश्रीत रेतीचा आणि गिट्टी खदानवरील इस्ट (माती मिश्रित बुगदी) चा सर्रास वापर सुरू आहे. हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, अधिकाऱ्यांकडूनही साधी पाहणीही केली जात नसल्याने कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम केले जात आहे. सदरचे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात येताना दिसून येत नाही. खोदकाम अतिशय कमी करण्यात आले. त्यामुळेच या पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी काँक्रीट करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोणीही कामावर कधी फिरकूनही पाहत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. 

गेल्या अनेक वर्षांनंतर या मार्गावरील पुलाची समस्या निकाली निघाली. मात्र, सदोष बांधकामामुळे या पुलाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचा दर्जा खालावल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्या अतिशय जुन्या असल्यामुळे त्या किती वर्षे टिकणार? हा सुद्धा प्रश्न आहे. पुलाखाली पाणी असल्याने संबंधित कंत्राटदाराने थातूरमातूर खोदकाम करून पुलाच्या भिंती उभ्या केल्या. मात्र, जमिनीमध्ये पाहिजे तशा प्रमाणामध्ये पाया केला नसल्याने या पुलाच्या बांधकामावर किती दिवस तग धरेल हे सांगणे कठीण आहे. 

चोरीच्या वाळूचा कामात वापर सदर पुलाच्या कामामध्ये परिसरात वाहणाऱ्या नाल्यातील मातीमिश्रीत वाळूचा उपयोग केला जात आहे. तसेच, गिट्टीवरील टाकाऊ खनिज घटकांमधील डस्ट (माती मिश्रित बुकटी) या ठिकाणी आणून काँक्रीटमध्ये मिक्स केले जात आहे. त्यामुळे या पुलाचे भविष्य टांगणीला लागले आहे.

"सदर पुलाच्या कामामध्ये मातीमिश्रित वर्धा नदीची काळी रेती आणि गिट्टी खदानवरील डस्ट (बुकटी) है अंदाजपत्रकामधील मिक्स डिझाइनमध्ये कुठेही नाही. त्यामुळे ते वापरणे चुकीचे आहे. यासंबंधी संबंधित कंत्राटदाराला सूचना करण्यात येईल." - गणेश गोंडे, शाखा अभियंता कार्यालय मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, उपविभाग आर्वी.

टॅग्स :wardha-acवर्धाroad transportरस्ते वाहतूक