शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्या ‘पुष्पा’च्या घरात सापडला चोरट्या ‘वैभव’चा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

पुष्पा किन्नाके हिच्या घराची पाहणी केली असता तेथे अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्यावर नातेवाइकांकडून मृताची ओळख पटली. पुष्पा हिच्या घरी नेहमी येणाऱ्या वैभव खडसे याचा हा मृतदेह असल्याचे लक्षात येताच अल्लीपूर पोलिसांच्याही भुवया उंचावल्या..या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असून काही व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/अल्लीपूर : अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मनसावळी या गावात पुष्पा किन्नाके हिच्या घरी वैभव अरुण खडसे (३०, रा. यवतमाळ) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.अनैतिक संबंधातून वैभव याची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. त्या दिशेने अल्लीपूर पोलीस सध्या तपास करीत आहे. दारू विक्रेता पुष्पा किन्नाके हिच्या कुलूपबंद घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी अल्लीपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी मनसावळी गाठून पुष्पा किन्नाके हिच्या घराची पाहणी केली असता तेथे अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्यावर नातेवाइकांकडून मृताची ओळख पटली. पुष्पा हिच्या घरी नेहमी येणाऱ्या वैभव खडसे याचा हा मृतदेह असल्याचे लक्षात येताच अल्लीपूर पोलिसांच्याही भुवया उंचावल्या..या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असून काही व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मृत वैभव खडसे याच्याविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल आहे. त्याने पुष्पा किन्नाके हिच्याच घरी चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याप्रकरणी पोलिसांनी वैभवला अटकही केली होती. तर आता वैभवचा मृतदेहच पुष्पाच्या घरी सापडल्याने आणि त्याची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असल्याने  हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

मृतक हा अविवाहित-    मृतक वैभव हा अविवाहित असून, दारू विक्रेता पुष्पा आणि वैभव यांच्यात चांगलीच जवळीक होती. वैभव हा नेहमीच पुष्पा हिच्या मनसावळी येथील घरी येत असे. शनिवारी वैभव याने त्याच्या एका मित्राला मनसावळी येथे सोडले. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पुष्पा हिच्या घरीच सापडल्याची माहिती वैभवच्या नातेवाइकांनी दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वैभवच्या कुटुंबीयांची आहे.

वैभवने केली होती पुष्पाच्या घरी चोरी; पोलीस घेत आहेत माहिती -    घनिष्ट संबंध असलेल्या पुष्पाच्या घरीच वैभव याने चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर त्याला पोलिसांनी अटकही केली होती. -    तर आता दारू विक्रेत्या पुष्पाच्या घरीच वैभवचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. -    वैभव याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या बाबतची अधिकची माहितीच सध्या अल्लीपूर पोलीस घेत आहेत.

पुष्पा किन्नाके हिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच मनसावळी गाठून पुष्पाच्या घराची पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तेथे सापडला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृतकाची ओळख पटली असून, वैभव अरुण खडसे (रा. यवतमाळ) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणाचा सखोेल तपास सुरू आहे.- सुनील गाडे, ठाणेदार, अल्लीपूर

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी