शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

गरिंबांना वस्त्रदान करण्यासाठी ‘कपडा बँक’ उपक्रम

By admin | Updated: August 15, 2016 01:11 IST

सदगुरू भैय्यूजी महाराज प्रणित सद्गुरु दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट इंदोर यांच्याद्वारे संचालित सूर्याेदय परिवार

सूर्योदय परिवाराचा पुढाकार : गरिबांची गैरसोय ओळखून सुरू केली सेवा पुलगाव : सदगुरू भैय्यूजी महाराज प्रणित सद्गुरु दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट इंदोर यांच्याद्वारे संचालित सूर्याेदय परिवार पुलगावच्या वतीने कपडा बँक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. येथील महावीर भवन समोर सदर शाखा सुरू करण्यात आली आहे. गरजू व गोरगरिबांना या उपक्रमातून दार महिन्याला कपड्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पुलगाव येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गोपाल नारलवार, जिल्हा परिषद सदस्य गजानन निकम, प्रभाकर शहाकार, दामोदर गोटमारे यांच्या हस्ते करण्यात आला. सूर्याेदय परिवाराच्या वतीने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात गरीब परिवारांना सूर्योदय कपडा बँक द्वारे कपड्यांचे वितरण करण्यात येत आहे. उद्घाटन प्रसंगी डॉक्टर नारलवार यांनी नवीन व जूने कपडे एकत्रित करुन कपडा बँकत जमा केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य गजानन निकम यांनी भैय्युजी महाराज याचा हा उपक्रम चांगला असल्याचे सांगत पुलगावच्या अधिकाधिक युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या कपडा बँकमध्ये जमा करण्यात आलेले कपडे दर माहिन्याला गरिबांना वितरित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला मदन पनिया, बहादुर चौधरी, संतोष पनपालिया, विलास भट्टड, शुभकरण सुराणा, प्रेमप्रकाश पाटनी, सुनील कोल्हे, केवल माखन, उमेश शर्मा, संदीप गीते, जुगल टावरी, अश्विन शाह, रवी केशरवानी, संतोष मरघाडे, लिलाधर पांडे, धनराज पनिया, अमित पडधरिया, प्रवीण पनिया, लीलाधर व्यास, नितीन रघाटाटे, निलेश सावरकर, अरविंद भार्गव, प्रसन्ना तिवारी, नीटू बजाज, शंकर पटेल, अजय शुक्ला, आनंद चौरसिया, संदीप चौरसिया, लक्ष्मीकांत चौरसिया, रवींद्र दुबे, कमाल पांडे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार पवनकुमार तिवारी यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी) दर महिन्याला होणार कपड्यांचे वितरण कपडा बँकेद्वारे जमा करण्यात आलेले कपडे दर महिन्याला विशिष्ट दिवशी परिसरातील गरिब व गरजू नागरिकांना वितरित केले जाणार आहे. यासोबतच गरिब परिवारातील मुलींच्या लग्नाकरिता मदत करण्यात येईल असेही सूर्याेदय परिवाराद्वारे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सूर्योदय परिवार द्वारे चालिवण्यात येणारी ही योजना नागरिकांच्याच सहकार्याने पुढे सुरू राहणार आहे. कपडा बँकेत केवळ नवीन कपडेच नाही तर जुने कपडेही स्वीकारले जाणार आहेत. जुने कपडे फेकून देण्यापेक्षा ते बँकेत दिल्यास गरिबांच्या कामी येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी यात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सूर्याेदय परिवाराच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.