शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

कोरानायनात देऊळ बंद ; कोट्यवधीची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:27 IST

Temple Wardha News Corona विदर्भासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरांना कोरोनाकाळात कोट्यवधीचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देकर्मचारी निम्या पगारावरस्वच्छतेसह व्यवस्थापनाचा खर्च कायमलहान व्यावसायीकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ प्रकोपामुळे सहा महिन्यांपासून राज्यभरातील देऊळ बंद आहेत. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील चार प्रमुख देवस्थानांसह इतरही मंदिरांचा समावेश आहेत. विदर्भासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरांना कोरोनाकाळात कोट्यवधीचा फटका बसला आहे. तसेच मंदिरलगतच्या परिसरातील लहान व्यावसायिकांवर उपसमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने नियम व अटींच्या अधिन राहून मंदिर उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

पुरणपोळीच्या प्रसादाकरिता प्रसिद्ध असलेले आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान, टाकरखेडा येथील संत लहानुजी महाराज देवस्थान, केळझरचे सिद्धीविनायक देवस्थान तर गिरड येथील फरिदबाबा दर्गाह हे जिल्ह्यातील चार प्रसिद्ध देवस्थान आहेत. जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानांमध्ये मोठी गर्दी असतात. गेल्या सहा महिन्यांपासून हे मंदिर बद असल्याने दानपेट्याही कोरड्या ठाक झाल्या आहे. तसेच देवस्थानची इतरही उलाठाल ठप्प झाली आहे. आजनसरा या देवस्थानला जवळपास ४० लाख, केळझरच्या देवस्थानाला आठ लाख, टाकरखेडच्या देवस्थानला २० लाख तर गिरडच्या दर्ग्याला जवळपास १० लाख असा एकूण ७८ लाखांचा फटका बसला आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतरही देवस्थांचा विचार केल्यास हे नुकसान कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतनही निम्मे करण्यात आले असून इतर खर्च करताना ओढाताण होत आहे. याशिवाय देवस्थान परिसरातील लहान व्यावसायिकांचे झालेले नुकसान यापेक्षा अधिक आहे.

आकस्मिक निधीवर पडला ताणया देवस्थानांमध्ये भाविकांकरिता विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. समारंभाकरिता सभागृह बांधले असून वाहनतळाचीही वेगळे व्यवस्था आहेत. काही ठिकाणी गो-शाळेसह इतरही प्रकल्प राबविले जात आहे. सोबतच देवस्थानाची स्वच्छता व सुरक्षा ठेवण्याकरिता कर्मचारी नियुक्त केले आहेत. नियमित व्यवस्थापन केले जात आहे. आता सहा महिन्यांपासून भाविकांनी देवस्थानात पायच ठेवले नसल्याने उत्पादनाचा स्त्रोत बंद झाला आहे. त्यामुळे आता व्यवस्थापनाला देवस्थानाच्या आकस्मिक निधीतून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे देवस्थानांना दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहेत.

दीड हजारांवर कुटुंबांचा रोजगार हिरावलादेवस्थान म्हटले की त्या परिसरात इतरही लहान व्यावसायिकांचे बस्तान असतातच. या चारही देवस्थानांमध्ये दररोज भाविकांची वर्दळ राहत असल्याने या ठिकाणीही मंदिरपरिसरालगतच लहान व्यावसायिकांची अनेक दुकाने आहेत.पण, लॉकडाऊनपासून या चारही ठिकाणचे दीड हजारांवरील दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अनेकांनी आता शेतमजुरीचा मार्ग स्वीकारला असून कशीबशी उपजीविका चालवित आहे. 

टॅग्स :TempleमंदिरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस