शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मराठा आरक्षणाला तेली समाजाचा पाठिंबा

By admin | Updated: September 29, 2016 00:53 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता तेली समाजाचा विरोध नाही, मराठा समाजाची मागणी योग्य असून त्यांना आरक्षण देण्यात यावे.

रामदास तडस : महाराष्ट्र तैलिक महासभा कार्यकारिणी बैठकवर्धा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता तेली समाजाचा विरोध नाही, मराठा समाजाची मागणी योग्य असून त्यांना आरक्षण देण्यात यावे. परंतु सद्याच्या आरक्षणात कोणताही बदल न करता सर्व मराठा समाजातील विविध जाती, पोटजाती यांचा समावेश मराठा समाजाच्या आरक्षणात करावा, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांची सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्ष म्हणून खा. तडस बोलत होते. प्रमुख उपस्थिती तेली समाजाचे नांदेड येथील १०८ श्री श्री संत सिध्देध्वरलिंग महाराज, महासचिव भुषण कर्डीले, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, सहसचिव बळवंत मोटघरे, सहसचिव संजीव शेलार, मधुअण्णा चौधरी, नाशिक विभागीय अध्यक्ष आर.टी. अण्णा चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव गवळी, शरद तेली, शंकर हिंगासपुरे, युवा आघाडीचे विक्रम चांदवडकर, देवळी नगराध्यक्ष शोभा तडस, दिलीप चौधरी, सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे, सुनिल चौधरी, अनिल आष्टणकर, सखाराम मिसाळ, बबनराव फंड, दिलीप चौधरी, विषय त्रंबकराव, जे.यु. मिटकर, सतीश वैरागी, कचरु वेलांजकर, श्रीराम आगासे, चंद्रकांत वाव्हळ, किसना देठे, संजीव शेलार, संजय विभुते, सर्व प्रदेश उपाध्यक्ष, सर्व विभागीय अध्यक्ष, प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष उपस्थित होते. या कार्यकारणी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यात २०१७ च्या राज्यस्तरीय मेळाव्याबाबत चर्चा केली. समाजाचा महामेळावा वर्धा येथे घेण्यात यावा यावर निर्णय घेण्यात आला. तैलिक महासभेच्या संकेतस्थळाचे सादरीकरण करण्यात आले. गुणवंत बत्तासे यांनी तयार केलेली ‘आम्ही तेली’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. महाराष्ट्र विभागीय, जिल्हा, तालुका पातळीवर युवक, महिला व सेवा आघाडी नियुक्त्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व संघटना सभासदांची नोंदणी व ओळखपत्र देणे, तेली समाजातील जनगणना, खानेसुमारीबाबत आढावा घेण्यात आला. तेली समाजाच महाराष्ट्रातील गाव पातळीवर नियुक्त पदाधिकऱ्यांचे लिखीत स्वरूपात नावे, पत्ता, दूरध्वनी क्रमांक असावे याबाबत निर्णय घेण्यात आला. तेली समाज राज्यात मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेली समाजाच्यावतीने नागपूर येथे केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार नागपूर येथे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सभेत तेली समाजाचे महाराज १०८ श्रीश्री संत सिद्धेश्वरलिंग महाराज यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी तेली समाजाचा इतिहास सांगितला. भूषण कर्डीले, नानाजी शेलार यांनी मार्गदर्शन केले. संचालन सहसचिव बळबंत मोटघरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे यांनी मानले. सभेला अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, गडचिरोली, जालना, धुळे, नंदूरबार, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, बीड, भंडारा, मुंबई, ठाणे, बुलढाणा, परभणी, जिल्हा मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशीम, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, कल्याण जिल्ह्यातील अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)