शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांनी काढली समजूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:31 IST

गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता.

ठळक मुद्देबोरखेडीवासींनी बहिष्कार घेतला मागे : अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर बहिष्कार मागे घेण्यात आला.बोरखेडी (गावंडे) हे गाव महसुली दर्जा प्राप्त गाव आहे. झडशी ग्रामपंचायतीअंतर्गत येत असून वॉर्ड क्र. ३ मध्ये समाविष्ट आहे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याकडे वारंवार प्रशासनाने लक्ष वेधत तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या तोंडावर बहिष्काराच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विविध प्रलोभने देऊन ग्रामस्थांनी मतदान करावे याकरिता करण्याचा प्रयत्न झाले. मात्र ग्रामस्थ ठाम असल्याने तहसीलदार महेंद्र सोनवणे, गटविकास अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी चव्हाण व बुंदिले यानी गावात भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली.तहसीलदारांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला. यावेळी माजी पोलिस पाटील ईश्वर ढोके, प्रमोद धनविज रितेश ढोके, प्रदीप शंभरकर, विवेक ढोके, माणिक शंभरकर, प्रफुल्ल ढोके, कमलाकर सूर्यवंशी, पूनम धनविज, शोभा ढोके, मंगल ढोके, सुधीर ढोके कानुपात्रा ढोके, धनराज ढोके, अरुण शंभरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.रस्त्याचा विषय पडला मागेजिल्हा परिषद सदस्य विवेक हळदे यानी बोरखेडी येथील बसस्थानक ते गावापर्यंतच्या रस्त्याचा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत मांडला होता. विवेक हळदे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे या प्रस्तावावर सभागृहात परत चर्चाच झाली नाही. विषय मागे पडला.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार