शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या तांत्रिक गुन्ह्यांनी वाढविली पोलिसांची डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 16:06 IST

काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे. मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात आठ महिन्यांत २८ गुन्ह्यांची नोंद : हेवेदावे, राजकीय कुरघोड्यांसाठी गैरवापर वाढला

वर्धा : वैयक्तिक हेवेदावे, भांडण किंवा राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हाेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले, तरी तक्रारदाराच्या विरोधातच चोरी, दरोडेखोरीचे गुन्हे दाखल करून त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हेही वास्तव आहे. मात्र, काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे.

मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत. यात किरकोळ वादातून अथवा राजकीय वादातून दाखल झालेल्या तांत्रिक स्वरुपाच्या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जातीय मानसिकतेतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आणला गेला. मात्र, आजही हे अन्याय, अत्याचार होत आहेत हे देखील वास्तव आहे.

जातिव्यवस्था या वर्गावर अन्याय करीत असली आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा दुर्बलांचे संरक्षण करीत असला तरी हा कायदाच आता आमच्यावर अन्याय करीत असल्याच्या भावनाही अधिक तीव्र होत आहेत. समाज बदलत आहे. आपापल्या जातीचे अस्तित्व, अस्मिता जपत एकमेकांपासून अलग राहणारे समाजसमूह आता जवळ येऊ लागले आहेत. शिक्षण, नोकऱ्या, उद्योग, व्यवसाय, कला संस्कृतीतून सहजीवनाचे एक नवीन पर्व सुरू झाले. शिक्षण वा नोकरीच्या निमित्ताने दररोज एकत्र बसणे, उठणे, खाणेपिणे, काम करणे होत असते. परंतु, हे चाललेले असताना अचानकपणे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणे, ही बाब वृद्धिंगत होत असलेल्या सहजीवनाच्या प्रक्रियेला तडा देणारी ठरत आहे.

अ‍ॅट्रॉसिटीचे जेवढे गुन्हे दाखल होतात, त्यातील बहुतांश गुन्हे ‘तांत्रिक’ असतात, अशा तक्रारी आता वाढत आहे. यात काही प्रमाणत तथ्यही असले. राजकीय व वैयक्तिक हेवेदावे, भांडणे, राजकीय कुरघोड्या करण्यासाठी काही मंडळी या कायद्याचा गैरवापर करत असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.

जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे दाखल झालेले गुन्हे

अनुसूचित जाती - १७

अनुसूचित जमाती - ११

एकूण दाखल प्रकरणं- २८

कायद्याचा गैरवापर रोखण्याचे आव्हान

वर्षानुवर्षे चालत आलेल्या जातीव्यवस्था आजही कायम आहे. त्यातून अनुसूचित जाती-जमातीमधील नागरिकांवर होणारे अन्याय, अत्याचारही कायम आहेत. हेही वास्तव आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आला, तरी त्यानंतरही अत्याचार थांबलेले नाहीत. ते रोखायचे आव्हान आजही कायम आहे. मात्र, या कायद्याच्या वाढत्या गैरवापरामुळे खऱ्या पीडितांवरही अन्यायच होत आहे. त्यातून सामाजिक सलोखाही धोक्यात येत आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर रोखण्याचे आव्हानही उभे ठाकले आहे. त्यासाठी सर्व समाजाच्या साथीने, प्रबोधनाच्या मार्गाने काही पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘तांत्रिक’ किती व ‘खरे’ किती?

मागील वर्षभरात २८ गुन्हे दाखल झाली आहेत. या गुन्ह्यांपैकी ‘तांत्रिक’ किती व ‘खरी’ किती, असा सवाल उपस्थित होत आहे. तांत्रिक गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी तर वाढलीच आहे मात्र, खऱ्या पीडितांना न्याय मिळण्यावर याचा थेट परिणाम होतो आहे. तांत्रिक गुन्ह्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे इतर समाजांमध्येही अस्वस्थता वाढत आहे. त्यातून पोलीस यंत्रणेवरही ताण व जबाबदारीही वाढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा