शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण ऑनलाईन; मुलं ऑफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

काही खासगी शाळांचे कामकाज १५ तर शासकीय शाळांतील कामकाज २६ जूनपासून सुरू करण्यात आले. पालकांचे ग्रुप करून त्याद्वारे गृहपाठ देण्याचेच काम जिल्ह्यातील अनेक शाळांनी केले. विविध ठिकाणांहून अभ्यासाच्या लिंक या ग्रुपवर टाकून विद्यार्थ्यांना स्वंयअध्ययनाने अभ्यास पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले.

ठळक मुद्देगोंधळाची स्थिती : पालक-लेकरांना समजेचा, शाळांना जमेना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापनाची पद्धत सुरू करण्यात आली आहे. पण यावर कसं शिकवलं जावं, हे अद्याप शिक्षकांना न समजल्याने गोंधळाची स्थिती आहे. कित्येक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या नावाने निव्वळ लिंक फॉरवर्ड करून स्वयंअध्ययन करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांपुढे खुला केला आहे. परिणामी, शिक्षकांच्या ऑनलाईन शाळेत मुलं मात्र ऑफलाईन झाली आहेत.काही खासगी शाळांचे कामकाज १५ तर शासकीय शाळांतील कामकाज २६ जूनपासून सुरू करण्यात आले. पालकांचे ग्रुप करून त्याद्वारे गृहपाठ देण्याचेच काम जिल्ह्यातील अनेक शाळांनी केले. विविध ठिकाणांहून अभ्यासाच्या लिंक या ग्रुपवर टाकून विद्यार्थ्यांना स्वंयअध्ययनाने अभ्यास पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले. आपण काय शिकतोय, का शिकतोय याची कसलीच कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे गृहपाठ वेळेत नाही पूर्ण केला तर शिक्षेच्या भीतीने विद्यार्थी पालकांकडूनच हा गृहपाठ सोडवून घेत आहेत.ज्या मुलांचे पालक नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत, त्यांना स्वतंत्र मोबाईल देणंही धोक्याचं ठरत आहे. काही स्मार्ट पालकांनी मुलांना नोट पॅड घेऊन त्याचं नियंत्रण अ‍ॅपद्वारे स्वत:च्या मोबाईलमध्ये ठेवलं आहे. काही पालकांनी ऑनलाईनबाबत शाळा व्यवस्थापनाकडे नाराजीही व्यक्त केली.ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी पुरते गोंधळले आहेत. बाहेर कोरोनाची भीती आणि वर्ग सुरू झाल्यापासून आपल्याला त्यातील काहीच समजत नाही, ही भावना त्यांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे.निव्वळ लिंक पाठवून शिक्षण मिळणार कसं?शाळेने सुरू केलेल्या पालकांच्या ग्रुपवर रोज सकाळी विशिष्ट विषयांचे शिक्षक त्यांचा गृहपाठ रोजच्या रोज टाकतात. हा गृहपाठ कसा करायचा, हे समजून देण्यासाठीही विद्यार्थ्यांना लिंक दिली जाते. विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्यात काय समस्या येताहेत, हे जाणून घेण्याची तसदी शिक्षक घेत नाहीत. एखादा मुद्दा विद्यार्थ्यांना नाही समजला तर तो कोणाला, कुठं आणि कसा विचारायचं हे कोणालाच माहिती नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचा गृहपाठ पालकांची जबाबदारी झाली. वर्गातील अनेकांकडून गृहपाठ पूर्ण केला जात नाही. याविषयी कोणत्याही शिक्षकाकडून संबंधित विद्यार्थी किंवा त्याच्या पालकाकडे कसलीच चौकशी होत नाही.शिक्षकांची शिकवणीऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यवस्थेत कोणालाच वाटली नाही. अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने विद्यार्थ्यांना लिंक देऊन स्वयंअध्ययनाचा मार्ग शिक्षकांनी चोखाळला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी