शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

तुघलकी निर्णयाविरूद्ध शिक्षक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 9:56 PM

शिक्षण विभागाकडून दररोज तुघलकी निर्णय घेतले जातात. शासनाच्या शिक्षणाबाबत उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : शिक्षण तथा विद्यार्थीविरोधी धोरणांचा विरोध

आॅनलाईन लोकमतहिंगणघाट/समुद्रपूर : शिक्षण विभागाकडून दररोज तुघलकी निर्णय घेतले जातात. शासनाच्या शिक्षणाबाबत उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. बाजारू शिक्षण व्यवस्थेला आणून हजारो शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे धोरण अवलंबिले आहे. याविरूद्ध कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक एकवटले आहेत. याबाबत समुद्रपूरचे तहसीलदार दीपक करंडे व हिंगणघाट येथील तहसीलदार सचिन यादव यांना निवेदन देण्यात आले.प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास २ फेब्रुवारीपासून शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.निवेदनात, शिक्षकांवर वाढता अशैक्षणिक कामाचा ताण, २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, डिसीपीएस मधील घोळ संपवावा, विनाअनुदानित शाळांना तथा वर्गांना त्वरित अनुदान देण्यात यावे, जाचक अटी रद्द कराव्या, स्वयं अर्थसहाय्य शाळा देणे बंद कराव्या, आॅनलाईन संच मान्यतेतील त्रुटी दूर करून निवडश्रेणी सरसकट लागू करावी, विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून पद्धत सरळ व सोपी करावी, रिक्त जागा भरण्याची त्वरित कार्यवाही करावी, घड्याळी तासाप्रमाणे कार्य करणाºया शिक्षकांना मानधन देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.यापूर्वी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून तर १८ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करण्यात आले. २८ नोव्हेंबरला शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. निवेदन देताना विजुक्टाचे जिल्हा सचिव प्रा जयंत ढगले, प्रा. जुमडे, प्रा. प्रदीप सोनकुसरे, प्रा. प्रशांत पुसदेकर, प्रा. सुधाकर कापसे, प्रा. कातरकर, प्रा. शेख, प्रा. आंबटकर, प्रा. पुलगमकर, प्रा. रेवतकर, प्रा. बोधिले, प्रा. एलपूलवार, प्रा. ठोंबरे, प्रा. ढाले, प्रा. शेटे, प्रा. कोल्हारकर, प्रा. ठाकडा, प्रा. पाटील, प्रा. अभिजीत डाखोरे, प्रा. उरकुडकर, प्रा. खैरकर, प्रा. वरभे, प्रा. इंगळे आदी उपस्थित होते.