शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

क्षयरोग विभागाचा लाचखोर लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:36 IST

क्षयरोग विभागाचा कंत्राटी लेखापाल अमित राजेश दुबे याला त्याच्या तीन सहकाºयांकडून टीए बिल आणि पेट्रोलचे देयक काढण्याकरिता १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांची अटक केली.

ठळक मुद्देदेयक काढण्यासाठी केली १५ हजार रुपयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : क्षयरोग विभागाचा कंत्राटी लेखापाल अमित राजेश दुबे याला त्याच्या तीन सहकाºयांकडून टीए बिल आणि पेट्रोलचे देयक काढण्याकरिता १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांची अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.लाचलुचपत विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कंत्राटी पद्धतीने एसटीएस सुपरवायझर या पदावर उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कार्यरत आहे. त्यांचे व इतर तीन सहकाºयांचे सन २०१७ चे टीए बिल व पेट्रोल देयक मंजुरीकरिता देण्यात आले होते. या अगोदर प्राप्त असलेले सन २०१६ चे टीए बिल व पेट्रोल बिलाच्या एकूण बिलाच्या ५० टक्के रक्कम अमित दुबे हे लाच म्हणून मागत होते. परंतु तक्रारदारांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथे तक्रार नोंदविली.या तक्रारीवरुन मंगळवारी लाच मागणी संबंधाची पडताळणी करण्यात आली. जिल्हा क्षयरोग केंद्राचे कंत्राटी लेखापाल अमित दुबे यांनी तक्रारदारास व त्यांच्या इतर तीन सहकाºयांच्या देयकापोटी एकूण देयकाच्या ५० टक्के रक्कम म्हणजेच १५ हजार रुपयांची मागणी केली. लाच स्वीकारून गैरकायदेशीर मार्गाने स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेतला. अमित दुबे यांचे कृत्य कलम ७,१३(१)(ड), सह १३(२) ला प्र.का. १९८८ अन्वये गुन्हा होत असल्याने त्याच्या विरुद्ध वर्धा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, तसेच पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामजी ठाकुर, पोलीस निरीक्षक अभय दाभाडे, पल्लवी बोबडे, अतुल वैद्य, विजय उपासे, सागर भोसले यांनी केली आहे.