शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

सर्वेक्षण करुन तात्काळ नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

होळीच्या उत्साहावर अवकाळी पावसाने विरजण घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांनी सभागृहात केली. त्यामुळे सर्वानुमते यासंदर्भात ठराव घेण्यात आला. यासह इतरही सदस्यांनी विविध प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देस्थायी समितीचा ठराव : कोरोनाबाबत जनजागृतीच्या अध्यक्षांकडून सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील पाच तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास १ हजार ७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या निसर्गकोपामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेतला असून तो शासनाला पाठविला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदचे अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष वैशाली येरावार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती मृणाल माटे, पशुसंवर्धन व कृषी समिती सभापती माधव चंदनखेडे व समाजकल्याण समिती सभापती विजय आगलावे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजित बंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, लेखा व वित्त अधिकारी शेळके यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.होळीच्या उत्साहावर अवकाळी पावसाने विरजण घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांनी सभागृहात केली. त्यामुळे सर्वानुमते यासंदर्भात ठराव घेण्यात आला. यासह इतरही सदस्यांनी विविध प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी शासकीय कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेऊन कोरानाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्याच्या सूचनाही संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.स्वतंत्र ग्रामपंचायतीला हिरवी झेंडीवर्धा शहरातलगत असलेल्या आलोडी व साटोडा या दोन गावांमिळून साटोडा येथे गट ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीकडून आलोडी वासियांना सेवा पुरविण्यात नेहमीच दुजाभाव केला जातो. या परिसरात अनेक कामे प्रलंबित असतांना दुर्लक्ष केले जात असल्याने आलोडीवासीयांनी जिल्हा परिषदेला निवेदन देऊन आलोडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची मागणी केली होती. हा प्रश्न आज स्थायी समितीमध्ये घेऊन आलोडी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव शासनाकडे जाणार असून शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.गोपालकांना नुकसान भरपाई द्याउशिरापर्यंत आलेल्या पावसामुळे सध्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात ढोरकाकडा ही विषारी वनस्पती उगवली आहे. ही वनस्पती खाल्याने जनावरे दगावत आहे. सेलू तालुक्यासह इतरही तालुक्यामध्ये ही वनस्पती खाल्ल्याने जनावरे दगावली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय करणाºया गोपालकांना दुधाळ जनावरे दगावल्याने मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, यासंदर्भातही स्थायी समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला.राष्ट्रीयीकृत बँकेतच गुंतवणूक करासध्या खासगी बँकात गुंतवणूक करणे अडचणीचे ठरत असल्याने जिल्हा परिषदेतील घसारा व घसारा पुनर्स्थापन फेरगुंतवणूक ही राष्ट्रीयकृत बँकेतच करावी, अशी मागणी माजी अध्यक्ष तथा भाजपा गटनेते नितीन मडावी यांनी केली. सोबतच हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) सर्कलमधील काजळसरा येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी या इमारतीचे लोकार्पण झाले नाही. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांरी उपलब्ध करुन दिल्यास इमारत सेवेत येईल, या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदagricultureशेती