शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Monetary Policy : RBI कडून तुर्तास दिलासा नाहीच, EMI कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार
2
खटका...! AAP नं साथ सोडण्याची केली घोषणा, काँग्रेसनंही दिलं जशास तसं उत्तर
3
बनावट आधार कार्ड, पुन्हा एकदा संसदेत घुसखोरीचा प्रयत्न; CISF ने तीन जणांना घेतले ताब्यात
4
अयोध्येतील पराभव बोचणारा...! मक्का आणि व्हॅटिकनचं उदाहरण देत सुधांशू त्रिवेदी स्पष्टच बोलले
5
अयोध्येमध्ये भाजपाला आघाडी, पण या मतदारसंघांमुळे बदललं फैजाबादमधील गणित
6
चाहत फतेह अली खानचं 'बदो बदी' गाणं युट्यूबवरुन डिलीट, काय आहे नेमकं कारण?
7
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मनसेची माघार, अभिजित पानसे भरणार नाहीत उमेदवारी अर्ज 
8
"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?
9
आजचे राशीभविष्य: व्यापारवृद्धी, अचानक धनलाभाचे योग; कामात यश, उत्साहवर्धक दिवस
10
मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल
11
Retirement Planning: रिटायरमेंटवर हवेत ₹५,००,००,०००? कितव्या वयापासून आणि किती रुपयांची करावी लागेल SIP? पाहा
12
"मला बिअर पिण्याचे डोहाळे लागले होते", अदिती सारंगधरने सांगितला प्रेग्नंन्सी काळातील अनुभव
13
Share Market Open : आधी घसरण, मग तेजी; सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये; विप्रो वधारला, हिंदाल्को आपटला
14
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
15
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
16
धक्कादायक! मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास
17
Blinkit च्या गोदामात अन्न सुरक्षेशी तडजोड! छाप्यात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित
18
ईएमआय वाढणार की घटणार? आज निर्णय, RBI जाहीर करणार पतधोरण
19
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
20
राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!

शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:56 AM

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट: येथील पंचायत समिती च्या कार्यालयात मागील ४० वर्षा पासून असलेला छत्रपती शिवराय यांचा पुतळा भंगलेला असल्याचे सांगून, तो पुतळा अवघ्या ४० रूपयात भंगरात विकणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी तालुका प्रगतीशील मराठा समाजाच्यावतीने केली. या मागणीचे बुधवारी तहसीलदार व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.पंचायत समितीच्या कार्यालयातील ...

ठळक मुद्देमराठा समाज: तहसीलदार व पोलिसांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट: येथील पंचायत समिती च्या कार्यालयात मागील ४० वर्षा पासून असलेला छत्रपती शिवराय यांचा पुतळा भंगलेला असल्याचे सांगून, तो पुतळा अवघ्या ४० रूपयात भंगरात विकणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी तालुका प्रगतीशील मराठा समाजाच्यावतीने केली. या मागणीचे बुधवारी तहसीलदार व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.पंचायत समितीच्या कार्यालयातील पुतळा दिसत नसल्याने पुतळयाबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा पुतळा केव्हाचाच भंगला व तो भंगारात टाकून विकल्याचे बेजबाबदार उत्तर अधिकाºयांनी दिले. महितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, शिवछत्रपतीचा पुतळा भंगारात विकण्याची अनुमती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य),जि.प. वर्धा यांनी दिली आहे. थोर रयतेच्या राजाचा पुतळा भंगार म्हणून ४० रुपयात विकताना पं.स.व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना काहीच कसे वाटले नाही. ही चितेची बाब असून या नीच कृत्यामुळे समाजात सर्वत्र असंतोष निर्माण झालेला असून या दोन्ही दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. माहितीच्या अधिकारात या पुतळया बाबत कालबाह्य असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. हा शब्द प्रयोग करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. त्वरित कारवाई न झाल्यास समस्त मराठा समाजातर्फे आंदोलनात्मक भूमिका घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी दोषी अधिकारी व शासकीय यंत्रणेची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शरद शिर्के, यशवंत शिंदे, हर्षल सालुंखे,प्रकाश लंके, विजय थोरवत, अक्षय भांडवलकर, अभिषेक चव्हाण, अक्षय निकम, अनिकेत निकम, नितिन भोसले,श्याम जाधव, प्रशांत गावंडे, निखिल लोंढे, विजय भाडवलकर, रामभाऊ नरवडे, सचिन सावंत, निखिल लोंढे, वैभव काले, सूरज माने, प्रल्हाद जाधव, रविन्द्र खडतकर, विलास जगताप, श्याम इडेपवार यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निवेदन देतांना समाज बांधवांनी तहसीलदार आणि पोलीस निरिक्षक यांच्याशीही सबंधित विषयावर चर्चा केली. त्यामुळे आता शहरातील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा प्रश्न चांगलाच गाजण्याच्ी शक्यता निर्माण झाली असून प्रशासन काय दखल घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज