शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

पिचकारी बहाद्दरांना तहसीलदारांनी दिला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:41 IST

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन तहसील कार्यालयात आलेल्यांना दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले. तहसील कार्यालयाच्या इमारतीत तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन भिंतीवर आणि कोपऱ्यात पिचकाऱ्या उडविणाऱ्यांना तहसीलदारांच्या आदेशवरुन प्रत्येकी दोनशे रुपयाचा दंड ठोठावण्यात आला.

ठळक मुद्देभिंतीवर थुंकणाऱ्या २३ जणांना ठोठावला दंड । तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन तहसील कार्यालयात आलेल्यांना दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले. तहसील कार्यालयाच्या इमारतीत तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन भिंतीवर आणि कोपऱ्यात पिचकाऱ्या उडविणाऱ्यांना तहसीलदारांच्या आदेशवरुन प्रत्येकी दोनशे रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे ‘येथे थुंकणे बरे नव्हे’ असे समजून इतरांनी मात्र तंबाखुजन्य पदार्थाची थुंकी गिळण्यातच धन्यता मानली.तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन, विक्री व जाहिराती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करिता प्रत्येक शासकीय कार्यालयात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविली जात आहे. पण, काही कार्यालयातील अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शनिवारी अंतिम तारीख असल्याने नागरिकांनी नवनिर्मित तहसील व उपविभागीय कार्यालयात एकच गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्यापैकी काहींनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करुन इमारतीच्या भिंती व कोपºयात तोंडातील पिचकारी टाकून भिंती रंगवायला सुरुवात केली होती. हा प्रकार तहसीलदार प्रीती डुडुलकर व नायब तहसीलदार डॉ. पाराजे यांच्या लक्षात येताच त्यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याचा आधार घेत कारवाईचा बडगा उगारला. भिंती रंगविणाऱ्यांचा शोध घेत कारवाई करण्यासाठी एका कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाºयाने शनिवारी दुपारपर्यंत २३ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्या कडून २ हजार ८०० रुपयाचा दंडही वसूल केला. हा दंड कोषागार कार्यालयात जमा करणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे अनेकांना धडकी भरली असून अशीच कारवाई कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सर्व कार्यालयांत अंमलबजावणीची गरजसार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यासोबतच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व विक्री करणे कायद्याने गुन्हा असतानाही शासकीय कार्यालयात याला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांत याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाहीची गरज आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार