शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांना निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:39 IST

येथील महिला तहसीलदार बाळू भागवत यांनी अंदोरी येथील प्रशांत चौधरी या शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुरूवारी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी थेट तालुकाकचेरी गाठून जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.

ठळक मुद्देशेतकऱ्याला मारहाण प्रकरण : प्रहारची तालुका कचेरीवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील महिला तहसीलदार बाळू भागवत यांनी अंदोरी येथील प्रशांत चौधरी या शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुरूवारी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी थेट तालुकाकचेरी गाठून जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महिला तहसीलदार भागवत यांच्या निलंबणाची मागणी केली.तहसीलदार भागवत यांनी मंगळवारी अंदोरी येथील शेतकरी प्रशांत चौधरी यांना मारहाण केली. त्यानंतर सदर शेतकºयाने गुरूवारी देवळी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून या प्रकरणी तहसीलदार भागवत यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२३ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी हा संपूर्ण घटनाक्रम घडल्यानंतर येत्या ४८ तासात आरोपी तहसीलदार भागवत यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून प्रहारने केली होती. घटना घडून बऱ्याच तासांचा कालावधीत लोटला तरी आरोपी तहसीलदारांवर जिल्हा प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्याने अखेर संतप्त प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मारहाण झालेल्या शेतकऱ्यासह शुक्रवारी सकाळी देवळीचे तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयाच्या आवारात सदर आंदोलनकर्त्यांनी येताच आरोपी तहसीलदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. शिवाय शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तहसीलदार भागवत यांच्यावर तात्काळ निलंबणाची कारवाई करावी, अशी मागणी केली. सदर आंदोलनाची माहिती तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना मिळताच नायब तहसीलदार प्रदीप वर्पे यांनी स्वत: आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच मागण्यांचे निवेदनही स्विकारले. आंदोलनात प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुऱ्हाटकर, हनुमंत झोटींग, वर्धा शहर अध्यक्ष विकास दांडगे, राजेश सावरकर, नितेश चतुरकर, अरविंद मसराम, तुषार वाघ, तुषार कोंडे, अमोद क्षीरसागर, शैलेश सहारे, हरिभाऊ हिंगवे, किरण ठाकरे आदी सहभागी झाले होते.कठोर कारवाईची शेतकरी संघटनेची मागणीवर्धा - शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तहसीलदार बाळू भागवत यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी कदम यांनी स्विकारले. निवेदन देताना माजी आमदार सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे सतीश दाणी, गजानन निकम, गणेश मुटे, सचिन डाफे, मंगेश मानकर, सारंग दरणे, धोंडबा गावंडे, खुशाल हिवरकर, पांडुरंग भालशंकर, शांताराम भालेराव, महादेव गोहो, माधुरी पाझारे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार