शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

रविवारी तिघे बाधित; यंत्रणेची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 5:00 AM

औरंगाबाद येथे एका कंपनीत काम करणारे २५ वर्षीय दोन युवक वर्ध्यात आल्याने त्यांना सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्त्राव नमुने शुक्रवारी तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून ते दोन्ही युवक कोरोनाबाधित आढळून आले.

ठळक मुद्देऔरंगाबादेतून आलेल्या दोन युवकांचा समावेश : सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात होते दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाहेर जिल्ह्यातून येणारे आणि बाहेर जिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांपासूनच आता धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सलग तिसºया दिवशी कोरोनाबाधित व्यक्तींचे निदान झाले आहे. आज एकाच दिवशी तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे.औरंगाबाद येथे एका कंपनीत काम करणारे २५ वर्षीय दोन युवक वर्ध्यात आल्याने त्यांना सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्त्राव नमुने शुक्रवारी तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून ते दोन्ही युवक कोरोनाबाधित आढळून आले. यातील एक युवक आर्वी तालुक्यातील मदना तर एक वर्धा शहरातील समतानगर परिसरातील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले. तसेच तिसरा रुग्ण हा पुलगाव येथील ६२ वर्षीय पुरुष असून ते सावंगी येथे उपचाराकरिता दाखल झाले होते. त्यांचाही अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.जिल्ह्यात पहिल्यांदाच सलग तीन दिवस तसेच एकाच दिवशी तीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे वर्ध्यातील रुग्ण संख्या ही १६ वर पोहोचली असून त्यातील ११ रुग्ण कोरानामुक्त झाले आहे. गेल्या तीन दिवसाच्या आकडेवारीवरुन जिल्ह्यात कोरोनाचा धोका या शिथिलतेच्या कालावधीत वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे.पुलगाव दोन दिवस बंद; २२ व्यक्ती क्वारंटाईनपुलगाव: येथील ६२ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या व्यक्तीला २५ जूनला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणी करिता पाठविले. शनिवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर लगेच आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून पुलगावामध्ये उपाययोजना सुरु केल्या. रुग्णाच्या संपर्कातली २२ व्यक्तींना कॉरंटाईन करण्यात आले. त्यातील हायरिक्समधील सात व्यक्तींना वर्धा तर लोरिक्समधील १५ जणांना देवळी येथे ठेवण्यात आले. रुग्ण आढळलेला परिसर पुर्णत: सील करण्यात आला असून नगरपालिकेकडून जंतुनाशकाची फवारणी सुरु केली आहे. रुग्ण आढळल्यामुळे मेडीकल व वैद्यकीस सेवा वगळून सर्व दुकाने व आस्थापना २८ व २९ जून या दोन दिवशी बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिले आहे. रुग्ण आढळल्यानंतर उपविभागीय अधिकारी बगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण धमाने, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल नारलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव, तहसीलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी परिसराची पाहणी केली.वॉर्ड क्रमांक ७; मध्ये आढळला रुग्णपुलगाव येथील वॉर्ड क्रमांक ७ मध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णावर सध्या सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण, त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासोबतच रुग्ण राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यामध्ये डॉ. झाकीर हुसेन शाळेपासून उत्तरेकडील शनी मंदिरापर्यंत, शनी मंदिरापासून दंतलवार यांच्या घरापर्यंत, दंतलवार यांच्या घरापासून क्रांती टॉकीज, क्रांती टॉकीज ते मकसुद अहमद यांच्या घरापर्यंत, अहमद यांच्या घरापासून दक्षिणेकडील शु प्लाझापर्यंत, शु प्लाझा ते गणराज स्टोअर्स आणि पुन्हा झाकीर हुसेन शाळेपर्यतचा सर्व परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या शिवाय लगतचा परिसर हा बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या कंटेन्मेंट झोन व बफर झोनवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.आवागमनासाठी बंदी ; सीसीटीव्हीची राहणार नजरकंटेन्मेंट झोनमध्ये येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात आवागमनासाठी बंदी राहणार असून शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी, आवश्यक वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, नर्स, मेडिकल दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक वस्तूंचा सेवा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी भगतसिंग चौकाजवळील प्रवेशद्वार मोकळे ठेवण्यात आले आहे. या परिसरात बॅरिकेटींग व इतर उपाययोजना करण्याची जबाबदारी नगरपालिका तर प्रतिबंधित क्षेत्रात सीसीटीव्ही लावण्याची जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपविली आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या