शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वर्धा जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक भरली; गेल्या वर्षी होता ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 15:59 IST

गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्धा जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे.

ठळक मुद्देमोठ्या ११ तर २० लघु प्रकल्पांचा समावेश गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रारंभी पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयांची पातळी खालावली होती. मात्र गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे. गेल्यावर्षी या महिन्यापर्यंत ठणठण असलेल्या जलाशयात यावर्षी मात्र पाण्याची मुबलकता दिसून येत आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात ११ मोठे तर २० लघू व मध्यम जलाशय आहेत. गेल्यावर्षी २१ जूलैपर्यंत आठही तालुक्यामध्ये १६१८.९७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती. यावर्षी याच कालावधीमध्ये २९३६.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरगाव प्रकल्प हाऊसफुल्ल झाला असून वर्धा कारनदी प्रकल्पही ९७.६१ टक्के भरला आहे. सोबतच दहेगाव (गोंडी) हा लघू प्रकल्प ९९.०० टक्के भरला आहे. यासह आंजी बोरखेडी, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी हे लघू प्रकल्पातही सध्या ७० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा आहेत. जिल्ह्यात उशिराका होईना पण, दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. विशेषत: सर्वच तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. अजून दमदार पावसाचे दिवस शिल्लक असल्याने यावर्षी सर्वच जलाशये हाऊसफुल्ल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन जलाशयाची दारे उघडलीवर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नांद प्रकल्प, वडगाव प्रकल्प, उर्ध्ववर्धा प्रकल्प आणि बेंबळा प्रकल्पाचा वर्ध्यासह नागपूर, अमरावती, यवतमाळ याही जिल्ह्याला मोठा फायदा होतो. यापैकी नांद प्रकल्प वगळता इतर सर्वच जलाशयांची पातळी ६० टक्क्यापेक्षा अधिक असल्याने वडगाव प्रकल्पाचे तीन तर बेंबळा प्रकल्पाचे २ गेट गेट १० से.मी.ने उघडण्यात आले आहे. त्यामुळे लगतचे नदी, नालेही ओसंडून वाहत आहे.

टॅग्स :Waterपाणी