बोरधरण येथील घटना : उपविभागीय पोलीस अधिकारी करणार प्रकरणाचा तपास सेलू : बोरधरण येथे एका हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवणासाठी गेलेल्या एका तरुणीचा सेलू पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू चौधरी यांनी विनयभंग केला. याबबात तरुणीच्या वडिलांनी शुक्रवारी रात्री सेलू पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावरून शनिवारी रात्री उशिरा विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.पोलीस सूत्रांनी दिलेल्या मािहतीनुसार वैद्यकीय शिक्षण घेत असलेली एक तरुणी व अभियांत्रिकी शिकत असलेले तरुण हे दोघे मित्र १४ जून रोजी दुपारी २ वाजता बोरधरण येथे एका हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले. तरुणी तेथील फ्रेश रूममध्ये असताना पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस कर्मचारी निलेश मेश्राम (ड्रायव्हर) व एक अनोळखी इसम हे तिघे पोलीस वाहनातून तेथे पोहोचले. त्यांनी तरूणीचा विनयभंग केला. मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर शुक्रवारी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असलेल्या वडिलांनी तक्रार दिली. या प्रकरणी शनिवारी रात्री उशीरा पोलीस अधीक्षकांच्या तपासानंतर भादंविच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
पोलीस उपनिरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
By admin | Updated: June 21, 2015 02:32 IST