श्रद्धेय बाबूजींना आदरांजली : प्रथम तीन विजेत्यांना पुरस्कारपुलगाव : स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात हरिराम भूत आदर्श हायस्कूल व उच्च माध्यमिक शाळेच्या इयत्ता अकरा व बारावीच्या २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात राखी बियाला प्रथम, प्रदीप काळे द्वितीय तर पायल गोडे हिला तृतीय पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रमोद लुंकड यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील दुम्पलवार यांनी व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी इच्छाशक्ती असेल तर तो सर्व परिस्थितीवर मात करून उंच शिखर गाठू शकतो. याप्रसंगी प्रथम पुरस्कार प्राप्त राखी बियाला हिचे निबंध वाचन घेण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. राजेश लाखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता हटवार, डोरले, बरवड, देशमुख, खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)