शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी रोखली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:28 IST

चिकणी येथील शिक्षणासाठी तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथे दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण देवळी येथेच घ्यावे लागते. असे असतानाही रापमच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मज्जावच केल्या जात असे.

ठळक मुद्देतासभर वाहतूक ठप्प : बस न थांबल्याने विद्यार्थी संतापले

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : चिकणी येथील शिक्षणासाठी तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथे दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण देवळी येथेच घ्यावे लागते. असे असतानाही रापमच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मज्जावच केल्या जात असे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना रापमच्या बसचालकांसह वाहकाने बसमध्ये बसु द्यावे, या मागणीसाठी गुरूवारी विद्यार्थ्यांनी चिकणी येथे रास्तारोको आंदोलन केले.जामणी येथून निमगाव व जामणीचे विद्यार्थी शिक्षणासाठी देवळी येथे ये-जा करतात. सकाळी ७.१५ ला पुलगाव-नागपूर बस येथून जाते. परंतु, सदर बसचालक व वाहक जामणी व चिकणी येथून विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास मज्ज्वाव करतात. विद्यार्थी न घेताच बस निघून जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून बसच रोकुन धरली. सकाळी पुलगाव-नागपूर ही बस चिकणी (जामणी) येथे आली असता बसमध्ये गर्दी असल्याचे कारण पुढे करीत विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू देण्यास मज्जाव करण्यात आला. दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांनी बसच रोखून धरली. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या मध्यस्तीअंती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी माघार घेतली. शिवाय देवळी-दहेगाव बससेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांच्या माध्यमातून रापमच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. सदर निवेदनाची प्रत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, देवळीचे ठाणेदार ठाकुर, रा.प.म.च्या विभागीय वाहतूक अधिकारी स्मीता सुतवने यांना पाठविण्यात आले आहे.आठ गावातील विद्यार्थी करतात ये-जातालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथे शिक्षणासाठी मलकापूर, केळापूर, दहेगाव (गावंडे), देहगाव (स्टेशन), निमगाव (सबाने), जामणी, चिकणी, पढेगाव या आठ गावांमधील विद्यार्थी ये-जा करतात.आजपासून पढेगाव मार्गाची बस सुरू करण्यात आली आहे. तसेच दहेगाव (स्टेशन), जामणी, चिकणी येथील विद्यार्थ्यांकरिता दोन-तीन दिवसात सकाळी ७.१५ वाजता एक अतिरिक्त बस फेरी वाढवणार आहे.- स्मीता सुतवनेविभागीय वाहतुक अधिकारी, रा.प.म. वर्धा.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportराज्य परीवहन महामंडळ