शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या वेळेसाठी खासदारांच्या घरी विद्यार्थ्यांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 21:52 IST

वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा शाळेच्या वेळेत महामंडळाची बस येत नसल्यामुळे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी खासदार रामदास तडस यांचे घर गाठून जागर केला.

ठळक मुद्देरापमच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा शाळेच्या वेळेत महामंडळाची बस येत नसल्यामुळे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी खासदार रामदास तडस यांचे घर गाठून जागर केला.परिवहन कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबाबत तसेच सवलतीचे पास मिळण्यासाठी होत असलेल्या त्रासाबाबत त्यांना विद्यार्थ्यांनी अवगत करून दिले. रापमच्या अधिकाऱ्यांना खासदारांनी योग्य सूचना द्याव्या अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली. तालुक्यातील मोमिनपूर येथे सकाळच्या पाळीतील विद्यार्र्थ्यांसाठी एस.टी. बस असल्याने त्यांना शिक्षण कार्यासाठी देवळीत जाणे शक्य होत आहे. परंतु, दुपारच्या पाळीतील विद्यार्थ्यांसाठी बसचा कोणताही वेळ नसल्याने या विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेत सोडून देण्यासाठी पालकांना त्रास घ्यावा लागत आहे. मोमिनपूर हे गाव अंदोरीपासून ३ कि़मी. अंतरावर आहे. त्यामुळे मोमिनपूर येथील विद्यार्थ्यांना घेवून ही बस व्हाया अंदोरीवरून देवळीला जात असते. मात्र, सकाळी १० ते १०.३० या कालावधीत कुठलीही बस मोमिनपूरला येत नसल्याने विद्यार्थ्यांची व पालकांची फरफट होत आहे.त्याचप्रमाणे मोमिनपूर ते अंदोरी पर्यंतच्या प्रवासात या विद्यार्थ्यांकडून तिकीटचे पैसे घेतले जातात. परंतु, तिकीट दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. देवळी बसस्थानकावर या विद्यार्थ्यांना सवलतीचे पास दिले जात नाही. तर काही एक कारण सांगून त्रास दिला जात आहे. या सर्व गाऱ्हाण्याची खासदार तडस यांनी दखल घेवून संबंधीतांना याबाबत विचारणा करून सुधारणा करण्याचे सांगावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसStudentविद्यार्थी