शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायद्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:58 PM

अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे. ही वाढती लोकसंख्या रोखली नाही, तर येत्या काळात गंभीर समस्या निर्माण होऊन भारताच्या अखंडता आणि एकात्मतेवर याचा परिणाम होऊ शकतो.

ठळक मुद्देराष्ट्रीय हिंदू आंदोलनातून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे. ही वाढती लोकसंख्या रोखली नाही, तर येत्या काळात गंभीर समस्या निर्माण होऊन भारताच्या अखंडता आणि एकात्मतेवर याचा परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यासाठी तातडीने कठोर कायदा करावा, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.सध्या प्रयाग, उत्तरकाशी, हरिद्वार, पुष्करालू(तेलंगणा) आदी विविध पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी माघ मेळा हा धार्मिक उत्सव भरत असतो. त्यानिमित्ताने लाखो भाविक पवित्र स्रानासाठी यात्रा करत असतात. अशा वेळी रेल्वे आणि परिवहन मंडळ यांच्याकडून भाडेवाढ करण्यात येते. केवळ हिंदुच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी करण्यात येणारी ही अतिरिक्त भाडेवाढ अन्यायकारक आणि धार्मिक भेदभाव करणारी असल्याने ती तात्काळ रहित करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सदर आंदोलन विकास भवनालगत करण्यात आले.देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व धर्मियांसाठी समान कायदे नसल्याने अल्पसंख्यांकाची लोकसंख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोरम आणि मणिपूर ही राज्ये आणि लक्ष्यद्वीप आणि निकोबार हे केंद्रशासित प्रदेश असून येथे हिंदु अल्पसंख्य झाले आहेत. देशात ५ कोटी बांगलादेशी, ४० हजार रोहिंग्या मुसलमान आणि व्हिसा संपूनही परत न गेलेले हजारो विदेशी नागरिकांमुळे भारताची अंतर्गत व्यवस्था खंगली आहे. हे न रोखल्यास २०३० पूर्वी भारतात हिंदु अल्पसंख्य होतील, असा दावा अनेक आंरराष्ट्रीय संस्थांनीही केला आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन राखणारा कायदा सर्व धर्मियांना लागू केला पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिल्पा पाध्ये यांनी यावेळी केली.हिंदुच्या माघ मेळाव्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेश शासन आणि तेलंगाना शासन यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाºयांसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा धार्मिक भेदभाव असून ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवणाऱ्या लोकशाहीप्रणालीच सर्व धर्मांना समान न्याय या तत्वाला हरताळ फासणारा असल्याचा आरोप करण्या आला आहे.याशिवाय गत २७ वर्षे होऊनही काश्मिरी हिंदुचे पूनर्वसन झालेले नाही, तर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सर्व सवलती मिळत आहेत. केंद्रशासनाने काश्मिरी हिंदुचे तात्काळ पुनवर्सन करून त्यांना हक्काचे स्वतंत्र ‘होमलँड’ द्यावे, तसेच बिहार राज्यात अल्पसंख्यांक युवकांना स्वयंरोजगार करता यावा, यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ५ टक्के व्याजावर देण्याची योजना आणली आहे. यासाठी १०० कोटींची तरतूदही केली आहे. सर्वसामान्यांकडून कर स्वरूपात वसूल करण्यात येणार पैसा देण्यात हा एकप्रकारे हिंदुवर अन्याय करणारा आहे.हे राज्यघटनेच्या तसेच समतेच्या कोणत्याही तत्त्वात बसणारे नाही. त्यामुळे ही योजना रद्द करून सर्व समाजासाठी समान योजना आखावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.