शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खासदार पुत्राच्या लग्नाची गोष्ट; वादावर अखेर ‘अंतरपाट’, फडणवीसांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 08:51 IST

सकाळी गाजले ‘ट्विटर वॉर’ अन् दुपारी उडाला ‘लग्नाचा बार’

ठळक मुद्देवर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचे सुपुत्र पंकज तडस यांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. वैदिक पद्धतीने विवाह करून मारझोड करून घराबाहेर हाकलून लावले, असा आरोप पूजा शेंद्रे नामक युवतीने केला होता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील भाजपच्या खासदार पुत्राने अत्याचार केल्याचा आरोप वर्ध्यातील एका युवतीने केला होता. यासंदर्भात नागपूर येथील पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर खळबळ उडाली. बुधवारी सकाळी या युवतीचा मदत मागणारा एक व्हिडिओ ‘ट्विटर’वरून शेअर करण्यात आला. मग लागलीच दुपारी खासदाररामदास तडस यांचे पुत्र पंकज आणि ती युवती दोघेही विवाहबंधनात अडकले. 

वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचे सुपुत्र पंकज तडस यांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. वैदिक पद्धतीने विवाह करून मारझोड करून घराबाहेर हाकलून लावले, असा आरोप पूजा शेंद्रे नामक युवतीने केला होता. व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली. पूजा यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर लागलीच विवाह करण्याच्या दृष्टीने घडामोडींनी वेग घेतला. वर्ध्यातील पांडे सभागृहात मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पंकज आणि पूजा यांचा वैदिक पद्धतीने विवाह सोहळा झाला. त्यानंतर दोघांनीही वर्धा नगरपालिकेमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रकरण दाखल केले. काही दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांमध्ये दाखल केलेली तक्रारही पूजा मागे घेणार आहे. आता दोघांचाही संसार सुरळीत चालावा यासाठी शुभेच्छा असणार आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असलेल्या तडस परिवारातील निकटच्या सदस्याने दिली.

रूपाली चाकणकर मदतीला धावल्यासंबंधित मुलीने बुधवारी एक व्हिडिओ जारी करीत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदतीची याचना केली. या व्हिडिओची दखल घेत चाकणकर यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर काही वेळातच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना पाठवून पीडितेला धीर दिला. 

फडणवीसांचा समन्वयाचा सल्लाn राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी जो व्हिडिओ ट्विट केला, त्या संदर्भात आपले खा. रामदास तडस यांच्याशी बोलणे झाले आहे. n त्यांच्या मुलाचे व त्या महिलेचे रजिस्टर मॅरेज झाले आहे. त्यांना मी सल्ला दिला की, हा विषय समन्वयाने सोडवला पाहिजे. कायद्याचा कुठे अनादर होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :marriageलग्नRamdas Tadasरामदास तडसMember of parliamentखासदारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस