शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वादळी पावसाचा पिकांना तडाखा

By admin | Updated: February 12, 2015 01:30 IST

गत दोन वर्षापासून रबी पिके ऐन बहरावर आली असताना निसर्गाचा कहर व त्यामुळे प्रचंड नुकसान हे समीकरणच जिल्ह्यात रूढ झाले आहे. गत वर्षी गव्हाची वाट लागली.

वर्धा : गत दोन वर्षापासून रबी पिके ऐन बहरावर आली असताना निसर्गाचा कहर व त्यामुळे प्रचंड नुकसान हे समीकरणच जिल्ह्यात रूढ झाले आहे. गत वर्षी गव्हाची वाट लागली. यंदा असे होणार नाही अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु जिल्ह्याला मंगळवारी मध्यरात्री वादळ वाऱ्यासह पावसाने पुरते झोडपून काढले. यात आठही तालुक्यातील गहू, चणा, तूर या उत्पादनावर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यात समुद्रपूर तालुक्यात एक बैल मरण पावला.याव्यतिरिक्त कुठलीही जीवितहानी झाल्याची नोंद नसली तरी पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ओंब्यावर आलेला गहू पुरता खाली झोपला. हरभरा पिकाचा फुलोरा गळाला. उरलासुरला कापूसही जमीनदोस्त झाला. यंदा आंब्याला चांगला बहर आला आहे. पण रात्रीच्या पावसाने हा बार रातोरात गळाला. तसेच फळावर आलेला संत्राही गळाला. इतर लिंबूवर्गीय पिकांचेही बरेच नुकसान झाले. कारंजा तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यात वायगाव(नि.), तळेगाव(टा.), शिरसगाव, गोजी, यासह पवनार, सेवाग्राम आदी शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले. वायगाव(नि) शिवारातील आशिष जिंदे, अशोक देशमुख, प्रशांत वाटगुळे, राजू भोमले, सतीश गोल्हर, पुंडलिक चावरे, पुरूषोत्तम वेले, प्रशांत आदींचे नुकसान झाले. आधीच सोयाबीन व कापसाला अत्यल्प भाव देऊन शेतकरी वर्गाची पिळवणूक केली जात आहे. त्यातच रबी पिकांचे नुकसान झाल्याने आता कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने नुकसानीचा सर्व्हे करून मदत द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क) कारंजात गारपिटीचा कहरकारंजा(घा.) - मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा कडकडाट, वादळी वारा व पावसासह काही ठिकाणी गारपिटीने कहर केला. तालुक्यातील हेटीकुंडी, मोर्शी, खरसरवाडा, ठाणेगाव, जामनी आदी गावातील गहू, हरभरा, तूर आदी पिके ऐन कापणीवर असताना मातीमोल झाली. भाजीपाला पिकांसह संत्रा, लिंबु फळपिकालाही याचा फटका बसला आहे. काल दिवसभर आकाश निरभ्र होते. परंतु मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस आणि गारांचा वर्षाव झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. गव्हाची पत जाण्याचाही धोका निर्माण आहे. वादळी पावसामुळे गहू लोटलाहिंगणघाट- तालुक्यात पहाटे विजेच्या गडगडाटासह वादळी पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के गहु लोटला. जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून लावलेल्या ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी सकाळी १०.२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. तालुक्यात गव्हाचा २ हजार हेक्टरचा पेरा असून यापैकी ओंबीवर आलेला ३० ते ४० टक्के गहू जमिनीवर लोटला. त्यामुळे. त्यामुळे नुकसान होणार होणार असल्याची माहिती आहे. कोरडवाहू चण्याचेही नुकसानसिंचनाची सोय नसलेले अनेक शेतकरी लवकर हरभरा पेरत असतात याला कोरडवाहू हरभरा म्हटले जाते. हा चना कापणीवर आला आहे. सेलू परिसरात अनेक शेतात या चन्याची कापणी करून त्याचे गठ्ठे जमा करून ठेवले होते. परंतु हा चणाही ओला झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सेलू परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहे.आंब्याचा बहर गळालायंदा आंब्याला भरपूर प्रमाणात बहर आला आहे. परंतु रात्री अवकाळी झालेल्या पावसाने आंब्याचा बहर मोठ्या प्रमाणात गळाला. त्यामुळे गावरानी आंब्याचा स्वाद चाखायला मिळेल का असा प्रश्न उपस्थित हित आहे. त्याच प्रकारे कारंजा(घा.) तालुक्यात गारांमुळे व जोरदार पावसाने संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले. आर्वीत गहू, हरभरा पिकांचे नुकसानआर्वी- मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पावसाचा आर्वीसह तालुक्यातील वाढोना, वागदा, नांदपूर, अहिरवाडा, सर्कसपूर, नेरी, खुबगाव, दहेगाव(मु.), निंबोली(शेंडे), वर्धमनेरी, जळगाव, टाकरखेडा, वाढोणा, पिंपळखुटा, गुमगाव, राजापूर, वाढोडा(पुनर्वसन), सावळापूर, वडगाव, रोहणा, साळधारा, चिंचोली(डांगे), पाचोड, हऱ्हाशी, एकलारा, धनोडी, बाजरवाडा, हरदोळी, पानवाडी आदी गावांना तडाखा बसला.गहू चना पिकांचे नुकसान झाले. आर्वीतील जिनिंग-प्रेसिंगमध्ये असलेल्या कापसाची गंज्या या अवकाळी पावसाने ओल्या झाल्या.