शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

‘धाम’ची साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

१९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देगाळाचा फटका : तीनपैकी एकाच ठिकाणाहून काढला गाळ

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्प पूर्ण झाल्यापासून या जलाशयातून गाळ काढण्यात आला नाही. परिणामी या जलाशयाची पाणी साठवण क्षमता तब्बल ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचे २०१४-१५ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पुढे आले. ‘गाळमुक्त धाम करेल पाणी समस्येवर मात’ या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच झोपेचे सोंग घेणारा पाटबंधारे विभाग सर्वेक्षणानंतर चार वर्षांनी खडबडून जागा झाला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गाळ काढण्याच्या कामाला लागला. परंतु, या विभागाने धामचे बुडीत क्षेत्र असलेल्या तीन पैकी केवळ एकाच ठिकाणावरून नाममात्र गाळ काढण्यात आल्याचे वास्तव असून धाम प्रकल्प अद्यापही पुर्णपणे गाळमुक्त झालेला नाही.प्राप्त माहितीनुसार, १९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता पुनर्जीवित करण्यासाठी २०१५ किंवा २०१६ मध्ये विशेष काम होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. वर्धा शहर व शहराशेजारील सुमारे १५ गावांतील नागरिकांना धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. परंतु, गाळयुक्त असलेल्या धाम प्रकल्प व धाम प्रकल्पात असलेल्या कमी जलसाठ्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात वर्धा शहरासह शहराशेजारील सुमारे १४ गावांना जलसंकटाला सामोरे जावे लागले. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम पूर्णपणे गाळमुक्त होणे गरजेचे असल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या खैरवाडा, मासोद व ब्राह्मणवाडा येथून गाळ काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून निश्चित करण्यात आले. त्या अनुषंगाने वर्धा पाटबंधारे विभागाने सुरूवातीला खैरवाडा (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये), मासोद (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये) व ब्राह्मणवाडा (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये) निधीचे प्राकलन तयार केले. परंतु, हा विषय अधिक खर्ची ठरू पाहत असल्याने व त्यासाठी निधी वेळीच उपलब्ध होणे थोडे अवघड असल्याचे लक्षात येताच धाम गाळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. त्याला एका कंत्राटदाराने प्रतिसाद देत जेसीबी व ट्रॅक्टर नि:शुल्क उपलब्ध करून दिले. तेव्हा मासोद परिसरातून नाममात्र गाळ काढला; पण उर्वरित दोन ठिकाणाहून गाळ काढला नाही. गाळमुक्त धाम हा विषय सध्यातरी अर्धवटच आहे.धाम १०० टक्के भरलामहाकाळी येथील धाम प्रकल्प उन्हाळ्याच्या अखेरीस मृत जलसाठ्यावर आला होता. त्यानंतर पावसाने आपला जोर कायम न ठेवल्याने यंदा हा जलाशय पूर्ण भरणार नाही, असा अंदाज वर्तविल्या जात होता. परंतु, बाप्पाच्या आगमनापूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.मासोद परिसरातून काढला ४४,२६४ घ.मी. गाळयंदाच्या उन्हाळ्यात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेनंतर वर्धा पाटबंधारे विभागाने पुढाकार घेत धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या मासोद परिसरातून गाळ काढला. दमदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वीपर्यंत या परिसरातून केवळ ४४ हजार २६४ घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. या प्रकल्पात असलेल्या गाळाच्या तूलनेत काढण्यात आलेला गाळ नाममात्र असून थोड्या प्रमाणातच या प्रकल्पाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Damधरण