शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:09 IST

अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत.

ठळक मुद्देआंबेडकरवादी एकता मंच व प्रहार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. ही दुकाने अतिक्रमण करून लावण्यात आली असली तरी ती अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान उचलल्या गेल्यावर कसाबसा रोजगार मिळालेले तरुण व कामगार पुन्हा बेरोजगार होतील. परिणामी, मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरवादी एकता मंच व प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन ठाणेदारांच्या मार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आले.अनेकांनी कर्ज घेवून मुख्य मार्गावर व इतर ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. पान टपरी, चहा टपरी, भाजी विक्री आदी व्यवसायातून हे तरुण व कामगार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत; पण २३ जूनला पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा गजराज अनेकांचा रोजगारच हिरावून घेणार आहे. यामुळे सदर होतकरू तरुणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेरोजगारांची व होतकरू तरुणांची समस्या लक्षात घेता राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात यावी. सर्वप्रथम या छोट्या व्यावसायिकांना स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातून व्यवसायासाठी जागा निश्चित करून देण्यात यावी, त्यानंतरच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन नगरसेवक तथा आंबेडकरवादी एकता मंचचे संयोजक कुंदन जांभुळकर यांच्या नेतृत्त्वात पुलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांना देण्यात आले. शिवाय निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अभय शिंगाडे यांनाही सादर करीत त्यांच्या मार्फत सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. सदर मागणीवर वेळीच विचार करण्यात यावा, अन्यथा बळाचा वापर करून पूर्वी सारखा अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा आम्ही विरोध करू तसेच तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना नगरसेवक कुंदर जांभुळकर यांच्यासह प्रकाश टेभुर्णे, करूणा टेभुर्णे, जमना खोडे, शोभा ठवकर, चंद्रकला डोईफोडे, प्रहार संघटनेचे नितीन बढे, राजेश सावरकर, तुषार वाघ, शैलेश सहारे, तुषशार कोंडे आदींची उपस्थिी होती. वाढती बेरोजगारी व तरुणांसमोर असलेले विविध आवाहने लक्षात घेवून योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.आंदोलनाचा इशाराअतिक्रमण हटाव मोहीम ही शहर विकास हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राबविल्या जात असली तरी या मोहिमेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शहर विकासाला आमचा विरोध नाही; पण पूर्वी या छोट्या व्यावसायिकांना हक्काची जागा द्यावी नंतरच ही मोहीम राबवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण