शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

औषधी दुकानावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:37 IST

समीर मेटांगळे हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. मृतकाच्या समर्थकांनी शनिवारी दुपारी २.४३ वाजताच्या सुमारास आरोपींपैकी एक प्रथमेश व्होरा याच्या वडिलांच्या राधा मेडिकलवर दगडफेक करून काच फोडल्या. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देसमीर मेटांगळे हत्या प्रकरण : दुचाकीने आले होते सुमारे ५० तरुण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समीर मेटांगळे हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. मृतकाच्या समर्थकांनी शनिवारी दुपारी २.४३ वाजताच्या सुमारास आरोपींपैकी एक प्रथमेश व्होरा याच्या वडिलांच्या राधा मेडिकलवर दगडफेक करून काच फोडल्या. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दगडफेक करणारे सुमारे ५० तरुण दुचाकीने आले होते. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विभव गुप्ताला शनिवारी रामनगर पोलिसांनी अटक केली.इंस्टाग्रामवर ‘आजची मुले आम्हाला शिकवतील काय’ असा मजकूर समीरच्या मारेकºयांपैकी काही तरुणांनी टाकला. तो कुणाला उद्देशून टाकला, याची विचारणा करण्यासाठी एकेकाळी चांगले मित्र असलेले आठ तरुण म्हाडा कॉलनी चौकात एकत्र आले. पैकी पाच जण समीर सोबत तर विभव गुप्तासह दोघे तेथे हजर होते. प्रारंभी शाब्दीक चकमक झाली. वाद विकोपाला जात हाणामारी झाली. यावेळी विभवने जवळील चाकू समीरला भोकसून त्याची हत्या केली. इतर तिघांनाही जखमी केले. यावेळी विभव जवळील चाकू हातातून पडला नाही वा तो कुणी हिसकावला नाही; पण घटनेत तो देखील जखमी झाला असून सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी समीरवर अंत्यसंस्कार होताच दुपारी २.४३ च्या सुमारास समीरच्या समर्थकांनी थेट आरोपी असलेल्या व्होराच्या राधा मेडिकलवर दगडफेक केली. या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी मनोज व्होरा यांचे नुकसान झाले.ग्राहक दडले दुकानांतदुचाकीवर ५० तरुणांनी दुकानावर दगड फेकण्यास सुरूवात केली. यावेळी दुचाकीने आलेले काही तरुण अनियंत्रित होऊन रस्त्यावर पडले; पण त्यांनी स्वत:ला सावरत पुन्हा हातातील दगड मेडिकलच्या दिशेने भिरकावले. यावेळी दुकानातील ग्राहक दुकानातच मिळेल त्या ठिकाणी दडून बसले होते. हल्लेखोर गेल्यानंतर सुमारे १५ ग्राहक सुखरूप दुकानाबाहेर पडले व त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.तक्रार देणे टाळलेराधा मेडिकलवरील दगडफेकीत मनोज व्होरा यांचे नुकसान झाले. घटनेची वार्ता पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती. या प्रकरणी व्होरा यांनी तक्रार देण्यास मात्र नकार दिल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात दहशत होती.रात्री उशीरा दोघांना सोडलेप्राथमिक चौकशीसाठी शुक्रवारी दुपारी एका अल्पवयीनासह प्रथमेश व्होराला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर रात्री ११ वाजता त्यांना मुक्त केले. दोघेही समीरला मारहाण करताना आरोपीसोबत होते, हे विशेष! शनिवारी रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर, योगेश गाढवे, रंजीत काकडे, ओमप्रकाश टेकाम, सागर चांगोले, मितेश पाटील यांनी विभवला अटक केली.सीसीटीव्ही फुटेज ताब्यातइंगोले चौकातील मनोज व्होरा यांच्या राधा मेडिकलवर तरुणांनी दगडफेक केली. हे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे.राजकीय दबावाचा वापरआरोपी विभव गुप्ता सोबत प्रथमेश व एक अल्पवयीन मुलगा मारहाण करताना हजर होते. यानंतर तिघेही दुचाकीने पळाले. प्रथमेशच्या वडिलांचे औषधी दुकान असून डॉक्टरांशी संबंध आहे. याचा वापर ते मुलाला वाचविण्यासाठी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. काही राजकीय पुढारीही हस्तक्षेप करीत असल्याचे बोलले जात आहे.