शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

दगडाने ठेचून इसमाची हत्या

By admin | Updated: March 22, 2017 00:37 IST

शहरात मंगळवारी सकाळी एका युवकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

चार दिवसात दुसरी हत्या : दोन्ही घटनेत कारण गुलदस्त्यात पुलगाव : शहरात मंगळवारी सकाळी एका युवकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सचिन महादेव पांडे (३२) रा. दखणी फैल असे मृतकाचे नाव आहे. आर्वी नाका परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली माजली आहे. सचिनच्या हत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या प्रकरणी रात्री उशिरा एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. शहरात रविवारी पालिकेच्या शाळेतील चौकीदाराची हत्या करण्यात आली. या हत्येचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागला नाही. यातच आज पुन्हा हत्या झाल्याने शहरवासीयांत चांगलीच दहशत पसरली आहे. दोन्ही हत्येचे कारण गुलदस्त्यात असून आरोपी फरार आहे. पोलीस सुत्रानुसार, पुलगाव आर्वी मार्गावरील गुरांच्या दवाखान्याच्या प्रवेश द्वाराजवळ एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची चर्चा गावात पसरली. माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला एक मोठा दगडही पडला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तो दगड जप्त केला असून तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविला असल्याचे सांगण्यात आले आहे. या युवकाच्या डोक्याच्या मागील बाजूवर व चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या जखमा दिसून आल्या. यामुळे सदर युवकाची हत्या दगडानेच ठेचून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. प्रारंभी अनोळखी असलेल्या मृतकाचे नाव सचिन पांडे असे असल्याचे समोर आले. सचिन पांडे हा त्याच परिसरातील दखणी फैल येथील असून तो वाहन चालकाचे काम करीत होता. त्याचे वडील, एक भाऊ असा परिवार आहे. सूचना मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कोल्हे यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी तक्रारीवरून भदंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मृतकाची अखेरची भेट गजू खोंडे (गजू) नामक युवकाशी झाल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. दोन-तीन दिवसांपूर्वी मृतकाचा काही युवकाशी जुगार खेळण्यावरून वाद झाल्याचे समजते. वाद झालेले काही युवक फरार झाले आहे. गत दोन दिवसात झालेल्या या दुसऱ्या हत्येमुळे शहरात भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी चौकीदार युवराज रामटेकेच्या मारेकऱ्याचा अद्याप पोलिसांना शोध लागला नसतानाच ही दुसरी हत्या झाली. (तालुका प्रतिनिधी)