शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

रेतीघाट लिलावातूनच चोरीला प्रोत्साहन

By admin | Updated: January 7, 2015 22:56 IST

रेतीघाटांचे लिलाव हा जिल्ह्यातील महसुलात भर घालणारा महत्त्वाचा घटक मानला जातो़ अधिकाधिक रेतीघाटांचे लिवाव झाले तर महसूल अधिक प्राप्त करता येतो; पण यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या

१५७ पैकी ३५ घाटांचे होणार लिलाव : रेती अल्प; पण घाटांची किंमत अधिकप्रशांत हेलोंडे - वर्धारेतीघाटांचे लिलाव हा जिल्ह्यातील महसुलात भर घालणारा महत्त्वाचा घटक मानला जातो़ अधिकाधिक रेतीघाटांचे लिवाव झाले तर महसूल अधिक प्राप्त करता येतो; पण यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागत असल्याने जिल्ह्यातील सर्वच घाटांचा लिलाव होत नाही़ कदाचित यासाठीच शासन, प्रशासन कमी घाटांतून अधिक महसूल गोळा करण्याचे प्रयत्न करीत असावे़ याचा प्रत्यय लिलाव होऊ घातलेल्या रेतीघाटांच्या यादीतून येत असून यातच रेती चोरीचे गुपित दडलेले दिसते़वर्धा जिल्ह्यातील ३५ रेतीघाटांचे लिलाव २० जानेवारी रोजी ई-टेंडरिंग पद्धतीने होऊ घातले आहेत़ यासाठीची प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू झाली आहे़ या लिलावामध्ये आष्टी तालुक्यातील ४, आर्वी तालुक्यातील ४, देवळी तालुक्यातील एक, हिंगणघाट तालुक्यातील १६ आणि समुद्रपूर तालुक्यातील १० रेतीघाटांचा समावेश आहे़ यातील बहुतांश घाटांमध्ये रेतीच अत्यल्प आहे; पण त्या घाटांची लिलाव किंमत अधिक ठेवण्यात आलेली आहे़ यामुळे रेतीच्या चोरी व चोरट्या वाहतुकीला प्रोत्साहन दिले जात असल्याचेच दिसते़ अत्यल्प रेती असताना घाटाची किंमत वाढविल्याने घाटधारक अधिक रेतीचा उपसा करून चोरट्या मार्गाने विकण्याचीच शक्यता बळावली आहे़ असा प्रकार एकाच ठिकाणी झाला असे नव्हे तर अनेक घाटांमध्ये तो दिसून येतो़ यातून रेतीच्या चोरीला प्रोत्साहनच दिले जात असल्याचे दिसते़ विकासात हातभार शून्यबहुतांश रेतीघाट ग्रामीण भागात आहे़ या गावांतील घाटांतून शासनाला महसूल प्राप्त होत असल्याने काही निधी गाव विकासावर खर्च होणे अपेक्षित आहे़ नियमात तशी तरतूदही आहे; पण असे होत नाही़ या महसूलाचा गाव विकासाला हातभार लागत नसल्याने बहुतांश गावांतून रेतीघाट लिलावास विरोध होत असल्याचे समोर आले आहे़