पुलगाव : विद्यमान नगराध्यक्ष काँग्रेसचे भगवानसिंग ठाकूर यांची कारकीर्द जूनच्या अखेरीस संपणार आाहे. नागरिकांच्या इतर मागास (ओ.बी.सी.) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी सत्तारूढ काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षाच्याही हालचालींना वेग आला आहे. १९ सदस्यीय नगरपरिषदेत सत्तारूढ गटात ‘एक अनार सौ बिमार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.१९ सदस्यीय नगरपरिषदेत सध्या काँग्रेस १0, भाजपा पाच, सेना एक व अपक्ष तीन असे पक्षबळ आहे. विद्यमान नगराध्यक्ष भगवानसिंग ठाकूर यांची कारकीर्द जून महिन्यात संपणार असून बहुधा २३ जून रोजी नवीन नगराध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगरसेवकामध्ये काँग्रेसकडे १0 नगरसेवक असले तरी इतर पक्षातील उमेदवारही नगराध्यक्ष बणण्याच्या शर्यतीत आहे. काँग्रेसकडे तीन उमेदवार इच्छुक आहेत. ज्याच्यावर नेत्याचा वरदहस्त राहील तोच उमेदवार राहणार हे ही निश्चितच आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सत्तापरिवर्तनाचे पडसादही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.नगराध्यक्षपदाच्या आरक्षित जागेसाठी सत्ताधारी गटासह भाजपा सेना व अपक्ष या सर्वच राजकीय वतरुळात एकापेक्षा जास्त उमेदवार असून अध्यक्षपदाचा ताज कुणाच्या शिरावर चढविल्या जाते हे मात्र त्या उमेदवाराच्या राजकीय प्रतिष्ठेवर तसेच ‘अर्थपूर्ण’ संदर्भावर अवलंबून असल्याची चर्चा आहे. यात भाजपा सेनेची महायुती कोणती खेळी खेळते व सत्तेची चाबी असणारी अपक्ष मंडळी कुणासोबत जाते यावर सुद्धा नगराध्यक्षपदाची भीस्त आहे. सत्तारूढ गटाच्या काही मंडळींनी भाजपा नेत्यांकडे हात मिळविण्यासाठी धाव घेतल्याची राजकीय वतरुळात चर्चा जोर धरत आहे.(तालुका प्रतिनिधी)
पुलगाव येथे नगराध्यक्ष पदाकरिता राजकीय हालचाली
By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST