शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा: एैसी धाकड है, धाकड है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 13:56 IST

महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्यावतीने आयोजित २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या महिला पहेलवांनी मैदान गाजविले.

ठळक मुद्देमुंबईचे पहेलवान ‘भारी’ तर पुण्याचे ‘लय भारी’

हरिदास ढोक ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्यावतीने आयोजित २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या महिला पहेलवांनी मैदान गाजविले. त्यात पुणे जिल्ह्याचाच बोलबाला राहिला असून इतर जिल्ह्याच्या पहेलवानांना छोबीपछाड देत स्पर्धेवर मोहर उमटविली. त्या पाठोपाठ मुंबईतील पहेलवानांनी कडवी झुंज देत उपविजेतेपदाचा मान पटकाविला.देवळी येथील नवनिर्मित खासदार रामदास तडस स्टेडीयमवर मागील चार दिवसांपासून महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचा महासंग्राम रंगला आहे. सुरुवातीला दोन दिवस पुरुषांची कुस्ती स्पर्धा पार पडली. त्यानंतर मंगळवार व बुधवारी महिलांची २१ वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा चांगलीच रंगली. दोन दिवस चालेल्या या महिला कुस्त्यांच्या सामन्यामध्ये विविध वजन गटात स्पर्धा झाली. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, लातूर, अहमदनगर, बीड, धुळे, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील पहेलवानांनी कुस्तीचा फड गाजवून पारितोषीक पटकाविले.या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.विदर्भातील मल्लांनी मारली बाजी२१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विदर्भातील महिला पहेलवानांनीही सहभाग घेतला होता. विदर्भातील मल्लांनीही आपल्या खेळाची चुणूक दाखवून विदर्भाचा ठसा उमटविला. या स्पर्धेत नागपूरच्या प्रिया घरजाळे हिने ५५ किलो वजन गटात तर अमरावतीच्या श्वेता सवई हिने ५७ किलो, भारती आमघरे हिने ६५ किलो व खुशबू चौधरीने ६८ किलो वजन गटात आपले वर्चस्व कायम राखले आहे.वजन गटानुसार विजेत्या महिला पहेलवान५० वजन गट- काजल जाधव (सोलापूर), किर्ती गुडलेकर (धुळे), निकिता गायकवाड (ठाणे), प्रगती ठोंबरे (बीड)५३ वजन गट- दिक्षा कराडे (कोल्हापूर), अक्षता वाळूज (पिंपरी चिंचवड), कोमल देसाई (ठाणे), सोनम सरकार (सोलापूर),५५ वजन गट- प्रिया घरजाळे (नागपूर), रुपाली वरदे (औरंगाबाद), प्रतिक्षा मुडे (बीड), श्रद्धा भोर (पुणे),५७ वजन गट- सोनाली तोडकर (बीड), प्रितम दाभाडे (पुणे), श्वेता सवई (अमरावती), लक्ष्मी पवार (लातूर)५९ वजन गट- विश्रांती पाटील (कोल्हापूर), काजल ढाकने (अहमदनगर), प्रतिक्षा नायकवाडे (सोलापूर), दुपाली सोनी (पिंपरी चिंचवड)६२ वजन गट- अंकिता गुंड (पुणे), भाग्यश्री भोईर (कल्याण), ऋृतिका मानकर (मुंबई), सरोज पवार (ठाणे)६५ वजन गट- मनाली जाधव (ठाणे), भारती आमघरे (अमरावती), जस्तिन शेख (नाशिक), जैमिया बागवान (लातूर)६८ वजन गट- हर्षदा जाधव (पुणे), खुशबू चौधरी (अमरावती), शिवाणी पाटील (मुंबई), तेजल सोनवने (पुणे)७२ वजन गट- कोमल गोळे (पुणे), ऋतुजा सपकाळ (कोल्हापूर), प्रियंका दुबुले (सांगली), वैष्णवी पायगुंडे (सातारा)७६ वजन गट- मनिषा दिवेकर, स्वाती पाटील (मुंबई), वर्षाराणी पाटील (मुंबई), भाग्यश्री गडकर (कल्याण)

टॅग्स :Wrestlingकुस्ती