वर्धा : सिल्लोड येथे औरंगाबाद-सिल्लोड- फर्दापूर रस्त्याचे चौपदरीकरण रस्ता व खडकपूर्णा वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभामुळे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील पर्यटन, कृषी व औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केले.९९ कि.मी लांबी व ७३५ कोटी रुपयांच्या औरंगाबाद-सिल्लोड-फर्दापूर रस्त्याचे चौपदरीकरण आणि सिल्लोडसाठी खडकपूर्णा प्रकल्पावरून वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या १०० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या हस्ते व पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी फुलंब्रीचे आ. कल्याण काळे, माजी जि. प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे, तालुकाध्यक्ष गणेश दौड, सोयगाव तालुकाध्यक्ष आबा काळे, शहराध्यक्ष प्रा. मन्सूर कादरी, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दुर्गाबाई पवार, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधीक्षक अभियंता मुखेडकर, कार्यकारी अभियंता जुमळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता रामदास पालोदकर, जि.प.सदस्य श्रीराम महाजन, बाबूराव चोपडे, कौतिकराव मोरे, कल्पनाताई लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल, केशवराव तायडे, देवीदास लोखंडे, उपनगराध्यक्ष किरण पवार, न.प. गटनेता नंदकिशोर सहारे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
औरंगाबाद-सिल्लोड-फर्दापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात
By admin | Updated: September 10, 2014 23:54 IST