शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : वर्ध्यात 24 तासांत सव्वासहा लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 14:06 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवापासून (8 जून) बेमुदत संप सुरू केला आहे

वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवापासून (8 जून) बेमुदत संप सुरू केला आहे. आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न काढण्यात आल्याने शनिवारी दुस-याही दिवशी आंदोलन सुरूच आहे. आंदोलनादरम्यान अवघ्या 24 तासात रापमच्या वर्धा विभागात दीड शतकाहून अधिक बस फे-या रद्द झाल्याने या विभागाचे सुमारे सव्वा सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात रापमचे वर्धा, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव असे पाच आगार आहेत. या पाचही आगारातून दररोज सुमारे ३५९ बस फे-यांचे नियोजन केले जाते. संपाच्या पहिल्या दिवशी केवळ अल्प मनुष्यबळामुळे अनेक बसफे-या रद्द झाल्या होत्या. या संपात रापमचे वाहक व चालकांसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी वाहतूक सेवा संपाच्या दुस-या दिवस असलेल्या शनिवारी प्रभावित झाल्याचे दिसून आले.

(ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?)

शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ७६ बस फे-या रद्द झाल्या होत्या. तर शनिवारी दुपारी १२ वाजता केवळ १८८ फे-या सोडण्यात आल्याचे रापमच्या अधिका-यांनी सांगितले. रापम कामगारांच्या या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील रापमच्या पाचही आगारात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसी बंदोबस्तातच रापमच्या वर्धासह पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव आगारातून बसेस सोडल्या जात होत्या. सदर संपामुळे काही प्रमाणात नागरिकांसह प्रवाशांना अनेक अडचणींचा सामनाच करावा लागला.

आंदोलन तीव्र होण्याचे संकेत

रापमच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारपासून संप पुकारला असला तरी या संपात कामगार संघटने संपूर्ण तर एमएमकेचे काहीच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने पाहिजे तशी रापमची वाहतूक सेवा प्रभावित झालेली नाही. आंदोलनाच्या दुस-याही दिवशी संबंधितांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर विचार न केल्याने शनिवारी विविध संघटनेच्या पदाधिका-यांनी चर्चा केली. येत्या काही तासात मागण्यांवर समाधानकारक तोडगा न काढण्यास इतर संघटनाही या संपात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे आंदोलन पुढील काही दिवसात तीव्र होण्याची शक्यता कर्मचा-यांकडून वर्तविला जात आहे.

आंदोलनात सहभागींचा मागविला अहवाल

बेमुदत संपामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. या संपाचा सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. रापम कर्मचा-यांनी सुरू केलेले आंदोलन गैरकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील पाचही आगारातून सदर संपात कोणकोण सहभागी आहे याचा अहवाल रापमच्या विभाग नियंत्रण कार्यालयाने मागवला आहे. तो अहवाल प्राप्त होताच त्यावर काय कार्यवाही केली जाणार, याकडे सा-यांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप