ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 09:29 AM2018-06-09T09:29:21+5:302018-06-09T09:33:35+5:30

एसटी कर्मचाऱ्यांना संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासन नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

MSRTC staffers go on flash strike over insufficient hike, cancellation of salary hike by government? | ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?

ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?

Next

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासन नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ रद्द करण्याचा प्रशासन विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  दरम्यान, घोषित वेतनवाढ मान्य नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (7 जून) मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपामुळे शुक्रवारी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एसटीच्या 25 हजार फे-या त्यामुळे रद्द झाल्या. शुक्रवारी 15 कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागले.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी व स्कूल बसना वाहतुकीची परवानगी दिली गेली. संप मोडण्यासाठी कर्मचा-यांची धरपकड करण्यात आली. संघटनेने 5 जूनला दिलेल्या पत्राची एसटी प्रशासनाने दखल घेतलेली नाही. चर्चेद्वारे तोडगा काढल्यास सध्याच्या 4 हजार 849 कोटींच्या पॅकेजमध्ये कर्मचा-यांना अधिक वेतन मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने पुढे यावे, असे एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले.

(एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल! आजही होणार त्रास? वेतनासाठी १५ कोटींच्या महसुलावर पाणी)

संपाबाबत कोणत्याही संघटनेने अधिकृत पत्र दिलेले नाही. काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर राहिले. या पद्धतीने प्रवाशांना वेठीला धरणे गैर आहे. वेतनकरार मान्य नसेल, तर औद्योगिक न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे.- दिवाकर रावते, परिवहन मंत्री

कोणत्याही संघटनेने संपाची नोटीस दिली नसताना एसटी कामगार रस्त्यावर उतरला. त्यातूनच वेतनवाढीबाबत त्यांच्यात किती असंतोष आहे, हे लक्षात येते.- हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

Web Title: MSRTC staffers go on flash strike over insufficient hike, cancellation of salary hike by government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.