आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर/नारायणपूर : समुद्र्रपूर तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील गोंविदपूर येथील शेतकरी साल्वंट जवळ रापमंची बस अनियंत्रित होऊन पुलाखाली झाडावर जाऊन धडकली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले असून चालकासह तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, नागपूर-चंद्रपूर मागार्ने चंद्रपूर आगाराची एम.एच.४० वाय ५२९६ क्रमांकाची बस चंद्रपूर येथून ५० प्रवासी घेउन निघाली. ती नागपूर येथे जाणार होती. दरम्यान गोविंदपूर शिवारात शेतकरी साल्वंट कंपनीजवळ बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या पुलात जावून धडकली. बस पिंपळाच्या झाळाला अडकल्याने उलटली नाही. यात अपघातात बसचा चालक महेश मडावी रा. चंद्रपूर, चंद्रभागा टोंगे (६०), शुभांगी भोयर (३०) रा. खांबडा, हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.विनोद कुमरे (५०), विलास तांदळे (४५), विजया रंगारी (५०), शालिक रंगारी (५५), दिलीप भानसिंगे (४०), भास्कर गौरकर (५०), सर्व रा. चंद्रपूर, नितेश कुडमते (१९) रा.भद्रावती, ईश्वर तारसे (४५), लताबाई तारसे (४०) या सर्व जखमींवर नंदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. झालेल्या या अपघातात एकूण १७ प्रवाशी जखमी झाले असून तिघे गंभीर आहेत. तर ३३ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेवून जखमींना बसमधुन काढत उपचाराकरिता रुग्णालयात पोहचवीले.घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट आगार प्रमुख संजय घुमे यांनी घटनास्थ गाठुन जखमीची नंदोरी येथील रुग्णालयात जावून भेट घेतली. समुद्रपुर पोलिसांनी घटनास्थळ गाठुन या अपघाचा पंचनामा करून नोंद केली असून तपास सुरू आहे.
एस.टी. बस पुलाखाली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:46 IST
समुद्र्रपूर तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील गोंविदपूर येथील शेतकरी साल्वंट जवळ रापमंची बस अनियंत्रित होऊन पुलाखाली झाडावर जाऊन धडकली.
एस.टी. बस पुलाखाली...
ठळक मुद्दे१७ जखमी : गोविंदपूर शिवारातील घटना