शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

हृदयद्रावक! एसटीनं डोळ्यादेखत पत्नीला चिरडलं; वृद्धावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 18:50 IST

धाडीच्या बसथांब्यावरील अपघात; बँकेच्या कामाकरिता साहुरला जात होते दाम्पत्य

- मंगेश ढवळेसाहूर : वृद्धापकाळात पती-पत्नीच एकमेकांचा आधार असल्याने वृद्ध दाम्पत्य बँकेच्या कामानिमित्त सोबतीने निघाले होते. अशातच काळ बनून आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने वृद्धाच्या डोळ्यादेखत सहचारिणीस चिरडले. रस्त्यावर निपचित पडलेल्या आपल्या वृद्ध पत्नीला वाचविण्यासाठी वृद्धाने पूर्ण प्राण एकवटून मदतीची मागणी केली. लागलीच नागरिकांनी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वृद्धेला रुग्णालयाकडे रवाना केले. पण, वाटेचत त्यांचा मृत्यू झाल्याने वृद्धाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना धाडी येथील बसथांब्यावर घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मृत कमलाबाई गोविंदराव ठाकरे (७०) आणि त्यांचे पती गोविदराव ठाकरे (७५) रा. धाडी, हे दाम्पत्य सोबतीने गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त साहूरला जाण्याकरिता निघाले होते. बस मिळावी म्हणून ते दोघेही धाडी येथील बसथांब्याकडे जात होते. या दरम्यान कमलाबाई आर्वी आगारातील एम.एच.४० एन.८४२९ क्रमांकाच्या वर्धा-वरुड या महामंडळाच्या एसटीच्या मागच्या चाकाखाली आल्या. यात चिरडल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. डोळ्यादेखत सहचारिणी रस्त्यावर तडफडत असताना पाहून गोविंदरावांचा गलबला सुरु झाला. मदतीसाठी त्यांनी थकलेल्या आवाजात टाहो फोडला. लागलीच समाजसेवक दिनेश लांडे, प्रशांत गावंडे, राहुल घोरमाडे, अनिल चोरे, देवराव भलावी व संदीप चोरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना धनराज गरजे यांच्या खासगी मिनीबसमध्ये टाकून वरुड येथील ग्रामीण रुग्णालयाकडे प्रवास सुरु केला. परंतु गंभीर दुखापत झाल्याने कमलाबाईने वाटेतच अखेरचा श्वास घेतला. या अपघातानंतर आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ताब्यात घेत पोलीस ठाण्यात लावली. याप्रकरणी बसचालक अनिल उंदरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. वृत्त लिहिस्तोवर आष्टी पोलिसांनी गुन्हाची नोंद केली नव्हती. पुढील कारवाई आष्टी पोलीस करीत आहे.धाडी बसस्थानकासमोर रस्ता दुभाजकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वारंवार अपघात घडल आहे. या सिमेंट मार्ग झाल्यामुळे वाहनेही सुसाट धावतात. त्यामुळे या मार्गावरील अपघात रोखण्याकरिता गतिरोधक देण्याची गरज आहे.दिलीप भाकरे,सदस्य, ग्रा.पं. धाडी

टॅग्स :state transportएसटी