शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

स्वयंस्फूर्तीने पाळला ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:00 AM

जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने खासगी व राज्य परिवहन महामंडळाची बससेवा रविवारी बंद ठेवण्यात आली होती. शिवाय रेल्वेची प्रवास सेवा बंद होती. त्यामुळे खासगी बसेस रस्त्याच्या कडेला तर रापमची लालपरी आगारात जमा होती. शिवाय बसस्थानक निर्मनुष्य होती. रविवारी प्रत्येक नागरिकाने घरात राहून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देलढा कोरोनाशी : वर्र्धेकर एकवटले, ‘गो कोरोना गो...’ चा दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ (कोरोना) या विषाणूला अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. इतकेच नव्हे तर केवळ किराणा, भाजीपाला व मेडिकल्स शॉप या जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण रविवारी ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने वर्धा शहरातील केवळ मेडिकल्स शॉपच उघडे होते. शिवाय औषधी विक्रेत्यांकडून ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने खासगी व राज्य परिवहन महामंडळाची बससेवा रविवारी बंद ठेवण्यात आली होती. शिवाय रेल्वेची प्रवास सेवा बंद होती. त्यामुळे खासगी बसेस रस्त्याच्या कडेला तर रापमची लालपरी आगारात जमा होती. शिवाय बसस्थानक निर्मनुष्य होती. रविवारी प्रत्येक नागरिकाने घरात राहून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी खडा पहारा दिली. शिवाय डॉक्टर आपातकालीन परिस्थितीशी दोनदोन हात करण्यासाठी सज्ज होते. पोलीस अधिकाऱ्यांकडून शहरात वेळोेवेळी गस्त घातली जात होती. तर चौकाचौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो कुणी रस्त्यावर आला त्याला थांबवून समज दिली. शिवाय त्यांच्या वाहनांची तपासणी केली. एकूणच जनता कर्फ्यूच्या निमित्ताने रविवारी शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होते. इतकेच नव्हे तर ठिकठिकाणी पोलिसांचा खडा पहारा होता. सूर्य मावळतीला जात असताना दुपारी ५ वाजता दिवसभर घरात थांबून असलेल्या नागरिकांनी घराच्या आवारात येत कोरोनाला हरविण्यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांप्रती टाळा वाजवून कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या जनता कर्फ्यूमध्ये छोटे-मोठे व्यापारी, किरकोळ व्यावसायिक, शेतमजूर, शेतकरी आदींनी स्वयंस्पूर्तीने दिवसभर घरी राहून सहभाग नोंदविला. शिवाय राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले. जनता कर्फ्यूच्या माध्यमातून वर्धेकरांनी गो कारोना गो चा संदेश दिला.वर्धा : कोरोनाला हरवायचे आहे तर प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या याच आवाहनाला वर्र्धेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रविवारी घरातच राहून ‘जनता कर्फ्यू’ पाळून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. इतकेच नव्हे, तर या ‘जनता कर्फ्यू’च्या माध्यमातून वर्र्धेकरांनी ‘गो कोरोना गो...’चा संदेश दिला. रविवारी नागरिकच घराबाहेर न पडल्याने नेहमी गर्दी राहणाºया ठिकाणी आज शुकशुकाट होता.चौकांमध्ये स्मशानशांततावर्धा शहरातील बजाज चौक आणि आर्वी नाका चौक हे दोन्ही महत्त्वाचे परिसर आहेत. शिवाय येथे नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने रविवारी या दोन्ही ठिकाणी स्मशानशांतता होती. शिवाय रस्ते निर्मनुष्य होते.फळविक्रेत्यांच्या हातगाड्या ‘हॉकर्स झोन’मध्ये जमाजिल्ह्यात कलम १४४ लागू झाल्यानंतर रविवारी वर्धा जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात आला. या कर्फ्यूच्या निमित्ताने हातगाड्यांवर जीवनावश्यक साहित्य विक्री करणाºयांनी रविवारी आपली दुकाने बंद ठेवली होती. शिवाय या छोट्या व्यावसायिकांनी आपल्या हातगाड्या ‘हॉकर्स झोन’मध्ये जमा केल्या होत्या.पेट्रोलपंप राहिले बंदनेहमी वाहनात इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोलपंपांवर नागरिकांची गर्दी राहते; पण रविवारी ‘जनता कर्फ्यू’दरम्यान वर्धा शहरातील बहुतांश पेट्रोलपंप बंद होते. त्यामुळे नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेले पेट्रोलपंप आज निर्मनुष्य होते. एकूणच पेट्रोलपंप असोसिएशननेही ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गप्पा, खेळ आणि टीव्हीच्या माध्यमातून केले मनोरंजनजनता कर्फ्यूच्या निमित्ताने घरात राहिलेल्या व्यक्तींनी बच्चे व वयोवृद्धांसोबत विविध विषयांवर गप्पा मारल्या. इतकेच नव्हे, तर बच्चे कंपनीसोबत विविध खेळ आणि दूरचित्रवाहिनीवर चित्रपट आणि मालिका बघून मनोरंजन केले. दुपारी ५ वाजता यंत्रणेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.किराणा दुकानेही होती बंद‘जनता कर्फ्यू’मध्ये शहरातील कापड व्यावसायिक, सराफा व्यावसायिक तसेच किराणा व्यावसायिक असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या व्यावसायिकांनी रविवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून घरीच राहून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या