शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

कोरोना संकटात मुखाग्नीसाठी मिळेना स्मशानशेडमध्ये जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

एका सामाजिक संघटनेने सुमारे चार वर्षांपूर्वी दोन शवदाहिनी यंत्र वर्धा शहरातील स्मशानभूमित लावले. शिवाय त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी वर्धा नगरपालिकेकडे देण्यात आली. पण जिल्ह्यावर कोरोना संकट ओढावण्यापूर्वीच या यंत्रात तांत्रिक बिघाड आला. मात्र, तो दूर करण्याकडे पालिकेतील लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. परिणामी हे यंत्र सध्या पांढरा हत्ती ठरू पाहत आहे.

ठळक मुद्देशवदाहिनी यंत्र बंदच । म्हसाळा, सावंगी (मेघे) येथे घेतला जातोय पर्यायी जागेचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दोन कोविड रुग्णालय असून ते सध्या वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर वर्धा शहरातील स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र, तेथील स्मशानशेड कोविड बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी कमी पडत असल्याने म्हसाळा आणि सावंगी (मेघे) येथे पर्याय शोधल्या जात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.एका सामाजिक संघटनेने सुमारे चार वर्षांपूर्वी दोन शवदाहिनी यंत्र वर्धा शहरातील स्मशानभूमित लावले. शिवाय त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी वर्धा नगरपालिकेकडे देण्यात आली. पण जिल्ह्यावर कोरोना संकट ओढावण्यापूर्वीच या यंत्रात तांत्रिक बिघाड आला. मात्र, तो दूर करण्याकडे पालिकेतील लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. परिणामी हे यंत्र सध्या पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कोविड बाधिताला वर्धा शहरातील स्मशानभूमित आणून त्यांच्यावर शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन अंत्यसंस्कार केले जातात. इतकेच नव्हे तर या ठिकाणी अन्य मृतकांनाही अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. पण सध्या या स्मशानभूमित कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानशेड कमी पडत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सध्या कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पर्यायी जागा शोधली जात आहे. लवकरच जागा निश्चित केली जाणार आहे.सेवाग्राम किंवा म्हसाळ्यात होणार अंत्यविधीसेवाग्राम येथील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कोरोना बाधितावर सेवाग्राम किंवा नजीकच्या म्हसाळा येथे अंत्यसंस्कार करण्याचे तालुका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी तहसीलदारांनी या दोन ठिकाणच्या स्मशानभूमिची पाहणी केली. लवकरच या विषयी ठोस निर्णय होणार आहेत.सावंगीच्या रुग्णालयात मृत्यू झालेल्यावर होणार सावंगीतच अंत्यसंस्कारएखाद्या कोरोना बाधिताचा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याच्यावर सावंगी (मेघे) शिवारातच कसे अंत्यसंस्कार करण्यात येईल, याविषयी सध्या अधिकाºयांकडून रणनीती आखल्या जात आहे. चर्चेअंती लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे.तहसीलदारांनी केली पाहणीवर्धा शहरातील स्मशानभूमित कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान शेड कमी पडत असल्याचे लक्षात आल्याने तहसीलदार प्रिती डुडुलकर यांनी शनिवारी सेवाग्राम, म्हसाळा तसेच सावंगी (मेघे) येथील स्मशानभूमिची पाहणी केली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या