१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:05+5:30

शेतकरी गजानन सुभाष घायवाट, धनराज साटोणे, गजानन मेंढुले, बाबाराव सातपुते, लिलाधर रेवतकर, निरंजन घायवाट, आंबोडा येथील सुधाकर लोखंडे आदींसह पढेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले काही कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटता सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Soybeans have not grown in 100 acres | १०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाही

१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाही

Next
ठळक मुद्देपढेगाव येथील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे सावट : कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : लगतच्या पढेगाव, चिकणी, जामणी, नीमगावसह लगतच्या गावखेड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकºयांनी सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची पेरणी केली. पावसाच्या ओलाव्यामुळे कपाशीचे बियाणे अंकुरले. काही प्रमाणात सोयाबीनचेही बियाणे अंकुरले. पण, काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती अल्प असल्याने पढेगाव येथील सुमारे १०० एकरावर पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट ओढावले आहे.
शेतकरी गजानन सुभाष घायवाट, धनराज साटोणे, गजानन मेंढुले, बाबाराव सातपुते, लिलाधर रेवतकर, निरंजन घायवाट, आंबोडा येथील सुधाकर लोखंडे आदींसह पढेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले काही कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटता सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी याची माहिती संबंधित कृषी केंद्र चालकांमार्फत कंपनीला दिली असता काही कंपनीच्या अधिकाºयांनी शेताच्या बांधापर्यंत येऊन पिकांची पाहणी केली.
पण, कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल की, नाही, या चिंतेत शेतकरी असून बियाणे कंपन्यांप्रती रोष निर्माण झाला आहे.

सोयाबीन पिकाची उगवण अल्प प्रमाणात झाल्यामुळे संबंधीत कृषिकेंद्र मालकाकडे तक्रार केली असता त्यांनी सिद्ध सीड्स प्रॉडक्ट कंपनीकडे पाठपुरावा केला. कंपनीचे तीन अधिकाऱ्यांनी शेतात येत पाहणी केली. सोयाबीन बियाण्यांचा लॉट नं. तपासून पुढील प्रक्रियेसाठी पाठविले. आणि दोन दिवसात याबाबत माहिती देतो, असे म्हणून शेतातून काढता पाय घेतला.
- धनराज साटोणे, शेतकरी, पढेगाव.

Web Title: Soybeans have not grown in 100 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.