लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात कोसळत असलेल्या संततधार पावसाचा फटका सोयबीन पिकाला बसला आहे. सखल भागात पाणी साचल्याने सोयाबीन पिवळे पडू लागले आहे. परिणामी सोयाबीनच्या उत्पन्नात घट होण्याची भीती व्यक्त होवू लागली आहे.सोयाबीन हिरवे असतानाही शेंगा लागल्या आहेत. तसेच खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतामधील ओलावा जमिनीमध्ये कायम आहे. असेच ढगाळ वातावरण कायम राहिले तर कपाशीची पाते व फूल गळती हा आजार येण्याची शक्यता आहे. तसेच बोंडअळीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोयाबीन सोबतच पऱ्हाटी उत्पादनात मोठी घट होवू शकते. असा अंदाज अनेक तज्ञ शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. यासंदभांत तालुका कृषी अधिकारी प्रज्ञा गुल्हाणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कपाशीची बोंडे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के डीएपीचे दहा लिटर पाण्यात द्रावण करुन त्यात चार मिली प्लानोफिक्स मिसळून फवारणी केल्यास बोंड अळी कमी होवून बोंडाची चांगली वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, शेतकºयांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.रोगनियंत्रणासाठी मार्गदर्शनाची गरजशेतकºयांना कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून सल्ला व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. एरवी शेतकºयांचा पुळका दाखविणारे कृषी कर्मचारी अडचणीच्या काळात नेमके गायब राहत असल्याचे चित्र आहे.
अतिपावसामुळे सोयाबीन, कपाशी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST
सोयाबीन हिरवे असतानाही शेंगा लागल्या आहेत. तसेच खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतामधील ओलावा जमिनीमध्ये कायम आहे. असेच ढगाळ वातावरण कायम राहिले तर कपाशीची पाते व फूल गळती हा आजार येण्याची शक्यता आहे. तसेच बोंडअळीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिपावसामुळे सोयाबीन, कपाशी धोक्यात
ठळक मुद्देकपाशीचे गळतेय पात, सोयाबीन पडतेय पिवळे : शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण, नुकसान होण्याची भीती