शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:15 IST

सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन पीक खराब होण्याच्या मार्गावर असून तुरीचे पीक पिवळे तर, कपाशीची परिस्थिती फारच वाईट झाली आहे.

वर्धा : सोयाबीन कापणीचा हंगाम ऐन तोंडावर आला असताना धो धो पाऊस कोसळत आहे. पाऊस न थांबल्यास सोयाबीनची कापणी कशी करावी. असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले असून अतिपावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

काही दिवसांतच सोयाबीन कापून घरात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता अशातच सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाने सुरुवात करत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मागील महिन्याची तूट पावसाने भरुन काढली परंतु या काळात पाऊस थांबला नसल्याने पाण्याच्या निचऱ्याअभावी शेतामध्ये पाणी साचत आहे. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन पीक खराब होण्याच्या मार्गावर असून तुरीचे पीक पिवळे तर, कपाशीची परिस्थिती फारच वाईट झाली आहे.

सततच्या पावसाने हिरवी कपाशीची बोंडे सडून शेतात त्यांचा सडा जिकडे तिकडे पाहायला मिळत आहे. ही सर्व भयानक परिस्थिती शेतकरी पाहात असताना हाताशी आलेला खरीप हंगाम हातचा तर जाणार नाही ना?, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. शंभर दिवस पूर्ण झालेले सोयाबीन पीक आता कापणीला आले आहे. या काळात सोयाबीन कापणी मळणी करेपर्यंत पाऊस थांबणे गरजेचे असताना जोरदार पाऊस सुरुच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तालुक्यातील ओल्या दुष्काळाच्या सावटात गत पंधरा दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले असून यावर्षी चांगल्या प्रकारे आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी