शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी सोयाबीन शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:23 IST

शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. पण कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झाले तर काहींची आता दुरूस्ती होत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्याचे नुकसान : दोन अवैध नाल्यांनी अडविली शेताची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. पण कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झाले तर काहींची आता दुरूस्ती होत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. देवळी तालुक्यातील मौजा मुसलाबाद येथे असाच प्रकार होत असून दोन नाल्यांनी शेताची वाट अडविली आहे. परिणामी सोयाबीन शेतातच ढिग मारून आहे. अद्याप ते काढता न आल्याने शेतकºयाचे नुकसान होत आहे.देवळी ते अंदोरी मार्गावर रायपूर गावाजवळ मौजा मुसलाबाद येथे वर्धेतील आशिष पावडे यांची तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी शेतात सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली होती. यातील सोयाबीनची कापणी करण्यात आली असून ते ढीग लावून शेतात ठेवण्यात आले आहे. सोयबीन काढण्याकरिता थ्रेशर, हडंबा यासारखे यंत्रसाहित्य शेतात घेऊन जाणे गरजेचे असते; पण शेतात जाण्याकरिता रस्ताच राहिला नसल्याने सोयाबीनची काढणी रखडली आहे. मुसलाबाद येथील पावडे यांच्या शेतालगत दोन नाल्या होत्या. त्या नाल्यांचे रूपांतर मोठ्या नाल्यामध्ये झाले आहे. सध्या रबी हंगामाकरिता कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतालगतचे दोन्ही नाले तुडूंब भरले आहेत. परिणामी, शेतात जाण्याकरिता रस्ताच राहिला नसल्याचे शेतकºयाकडून सांगितले जात आहे.याबाबत संबंधित शेतकºयाने पाटबंधारे विभागाकडे विचारणा केली. सदर विभागातील अधिकाºयांनी चौकशी केली असता दोन्ही नाले अवैध आहेत. ते कुणीही खोदलेले नाहीत. पाटबंधारे विभागानेही सदर कालव्याचे काम केलेले नाही, ही बाब समोर आले. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत. परिणामी, शेतकºयाने दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम उलटला असून परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेत विकलेही गेले आहे; पण पावडे यांना शेतात जाण्याकरिता रस्ताच नसल्याने अद्याप सोयाबीनची काढणीही करता आली नाही. परिणामी, त्यांच्यावर कर्जबाजारी होऊन जगण्याची वेळ आली आहे.पांदण रस्ता तयार करणे तथा नाले बुजविण्याची मागणीमुसलाबाद येथील पावडे यांच्या शेतात जाण्याकरिता कुठलाही रस्ता राहिलेला नाही. पांदण रस्त्यावर सर्वत्र झुडपांचे साम्राज्य आहे तर जो रस्ता होता त्याची वाट नाल्यांनी अडविली आहे. परिणामी, शेतातील शेतमाल घरी आणणेही कठीण झाले आहे. खरीप हंगामातीलच शेतमाल घरी आणता आला नाही तर तूर पिकाचे काय होणार आणि रबी हंगामातील पेरणी कशी करावी, आदी चिंता शेतकऱ्याला त्रस्त करीत आहे. महसूल प्रशासनाने पांदण रस्ता मोकळा करून त्याची दुरूस्ती करावी तथा नाले बुजवून शेताची वहिवाट करण्याकरिता रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी