शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

यात्रेतून जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:59 IST

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी नेत्यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे शेतकऱ्यांची संवाद साधला.

ठळक मुद्देहल्लाबोल यात्रेत अंदोरीत साधला संवाद

आॅनलाईन लोकमतदेवळी : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी नेत्यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे शेतकऱ्यांची संवाद साधला. शिवाय बोंडअळीची समस्या जाणून घेण्याकरिता शेतात जावून कपाशीची पाहणी केली. एवढी बिकट समस्या असतानाही शासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.यवतमाळ जिल्ह्यातून रविवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या यात्रेचा सोमवारी दिवसभर १३.५ कि.मी चा प्रवास झाला. शिरपूरवरून भिडी मार्गे ही यात्रा रत्नापूर, दापोरी, एकपाळा मार्गे देवळी येथे पोहचली. या यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रकाश गजबे, आ. विद्या चव्हाण, आ. गुलाबराव देवकर, चित्रा वाघ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, सुरेश देशमुख, राजु तिमांडे, सुधीर कोठारी, सुरेखा ठाकरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.नवरदेवाचा अजितदादांसोबत सेल्फीभिडी ते देवळी मार्गावर एक लग्नाची वरात या पदयात्रेच्या जवळ थांबली. या वरातीतील एका गाडीतून नवरदेव उतरला. दरम्यान नवरदेवाला अजीत पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा झाली. यावेळी अजीत पवारांसह इतर नेत्यांसोबत नवरदेवाने सेल्फी घेतली. यावेळी अजितदादांनीही नवरदेवाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आहेर देऊन लग्नासाठी रवाना केले.भाजपाने शेतकऱ्यांचा घात केला - जयंत पाटीलकापसाला ७ हजार व सोयाबीनला ६ हजाराचा भाव देण्याची हमी घेणारे हे सरकार केवळ थापा मारून सत्तेवर आले आहे. कापसाला चार ते साडेचार हजार व सोयाबीनला २ हजार २०० पर्यंतचा भाव देवून शेतकºयांचा गळा घोटला जात आहे. भाजपा सरकारने आमचा विश्वासघात केल्याची भावना जनसामान्यांची झाली आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. देवळी येथे हल्लाबोल रॅलीच्या सभेत ते बोलत होते.सुप्रिया सुळेंचे कोरकू आदिवासींसोबत नृत्यहल्लाबोल यात्रेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांनी यात्रेत सहभागी कोरकु आदिवासी बांधवांसह नृत्य केले. त्यांचे नृत्य पाहून परिसरातील नागरिकांनीही फेर धरला. यात्रेदरम्यान सहभागी नेते सर्वसामान्यांशी जुळवून घेत असल्याचे दिसून आले.वर्धा शहरात मंगळवारी जाहीर सभाहल्लाबोल पदयात्रा सोमवारी रात्री देवळी गावात मुक्कामी आहे. तेथून ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता वर्धा शहरात पदयात्रा पोहचणार आहे. त्यानंतर सर्कस ग्राऊंड मैदानावर जाहीर सभा होणार आहे.