लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजनसरा तीर्थस्थळाचा महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. आजनसरा ते थाटेश्वर पालखी रस्त्याचे बांधकाम व संगम घाटाचे सौंदर्यीकरण अशी कामे होणार आहे. त्यामुळे भाविकांना आजनसरा येथे जाणे सुकर होणार आहे.वर्षानुवर्षे खड्डे आणि गोटे उघडे पडलेल्या या रस्त्यावरून वारकरी मार्गक्रमण करतता. चिखल तुडवर दलदल ओलांडून वारकरी वर्धा-यशोदा नदीच्या संगमावर स्नान करण्यास जात होते. दिंडी घेऊन जाताना त्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत. या संगमावर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. थाटेश्वर ते आजनसरा देवस्थानला जाणाऱ्या भाविकांचे ते श्रद्धास्थान असल्याने येथे गर्दी असते. निसर्गरम्य परिसर लाभला असल्याने याचा पर्यटनस्थळ म्म्हणून विकास करता येतो. थाटेश्वर येथे महादेव मंदिरात भाविकांचे आवागमन सुरूच असते. त्यांनाही या कच्च्या रस्त्याने जाताना अडचणीला तोंड द्यावे लागत.या सर्कलचे पं.स. सदस्य डॉ. विजय पर्बत यांनी स्थानिक लोकांच्या सहकार्याने नदी संगम व थाटेश्वर पालखी रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी शासनाकडे लावुन धरली. खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार यांना निवेदन देण्यात आले. याची दखल घेत खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार यांनी महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून विकास करण्यासाठी प्रयत्न केले. याकरिता प्रकल्प संचालक बोर्शे, अभियंता प्रणव जोशी यांनी सहकार्य केले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शशिकांत मांडेकर, ग्रा.पं. सदस्य भोजराज बावणे, विश्वस्त रमेश ठाकरे, धनराज मेश्राम, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, शिवदास पर्बत, देवराव नरड, सुभाष रेवतकर, देवराव कोपरकर, राजेंद्र बावणे, विनोद आष्टनकर, संजय कोपरकर, अंकुश ढवळे आदी उपस्थित होते.खासदारांच्या प्रयत्नाने विकास आराखड्यातील अडचण दूरया रस्त्याला व्ही.आर. नंबर नसल्याने अडचणी आहेत. परंतु शासनाकडून रस्त्याचा विकास आराखडा बनविणे सुरू आहे. संत भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव १३ एप्रिलला आहे. ही अडचण लक्षात घेवून खा. तडस व आ. कुणावार यांनी मध्यस्थी करीत तात्पुरता रस्ता दुरूस्ती करण्याचे आदेश दिले. राळेगाव वडनेर हायवे प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनात मुरूम व डांबर, गिट्टी टाकून रस्ता तयार केला.
अखेर रस्ता झाला सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:12 IST
आजनसरा तीर्थस्थळाचा महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. आजनसरा ते थाटेश्वर पालखी रस्त्याचे बांधकाम व संगम घाटाचे सौंदर्यीकरण अशी कामे होणार आहे.
अखेर रस्ता झाला सुकर
ठळक मुद्देभाविकांना दिलासा : निसर्गरम्य परिसराचा होणार विकास