शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या 'मुलाने'च केली जन्मदात्या 'आई'ची हत्या, तालुक्यात खळबळ

By महेश सायखेडे | Updated: May 22, 2023 16:23 IST

राहत्या घरीच गाढ झोपेत असताना काठीने केले वार 

वर्धा : गाढ झोपेत असलेल्या आईवर मुलानेच काठीने वार करीत तिची हत्या केल्याने आर्वी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील बेनोडा (माटोडा) येथे घडली असून कौशल्या महादेव तुमसरे (८२) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी हेमराज महादेव तुमसरे (४२) रा. बेनोडा (माटोडा) याला अटक केली आहे.

बेनोडा (माटोडा) येथील घटनेची माहिती मिळताच आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी त्यांचे सहकारी सुनील मलनकर, इमरान खिलजी, दिगंबर रुईकर, किरण कुरडकर, अंकुश निश्चत, अतुल गोटफोडे, राहुल देशमुख यांच्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करीत कौशल्या तुमसरे यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.

वयोवृद्ध कौशल्या दोन्ही पायांनी अपंग 

८२ वर्षीय कौशल्या या दोन्ही पायांनी अपंग असल्याने त्या जमिनीवर घासत घासत चालायच्या. कौशल्या आणि कौशल्याचा मुलगा हेमराज यांच्यात कुठल्या कारणावरून वाद होत तो विकोपाला जात हेमराजने थेट कौशल्याची हत्या केली या बाबतची अधिकची माहिती सध्या आर्वी पोलीस घेत आहे.

हेमराज दोन दिवसांपासून करीत होता चिडचिड

हेमराज तुमसरे हा मागील दोन दिवसांपासून चिडचिड करीत असल्याने त्याची पत्नी ललिता व मुलगी सलोनी हे चुलत भासरे रंगराव तुमसरे यांच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. तर हेमराज व हेमराजची आई कौशल्या हे दोघेच घरी होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तुमसरे कुटुंबिय जागे झाले. अशातच काठीने मारहाण केल्या जात असल्याचा आवाज आल्याने हेमराजच्या घराचे दार उघडण्यात आले. तेव्हा हेमराज हा आई कौशल्या हिला काठीने मारहाण करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शीयांना दिसल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा