अनिल गोटे : आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबांना मदतहिंगणघाट : समाजातील शेवटच्या टोकावर राहणाऱ्या दरिद्रीनारायणाच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा उमटते, त्यावेळी मिळणारा आनंद हा प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचा आनंद असतो, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अनिल गोटे यांनी केले. डॉ. बी.आर. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला दक्षिण नागपूरचे आ. सुधाकर कोहळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आ.मो. जवादे, शिक्षण उपसंचालक एम.बी. पवार, अभय घोटेकर, दिलीप देशमुख, मेघश्याम करंडे, प्राचार्य पाटील उपस्थित होते. यावेळी अरुणा झोटींग, ज्योती गावंडे, कुसूम बचाटे, वनमाला ठक, मुक्ता नरड या शेतकरी महिलांचा साडीचोळी व रोख मदत देऊन सन्मान करण्यात आला. आ. कोहळे, संस्था सचिव अनिल जवादे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य पाटील यांनी, संचालन उमेश ढोबळे यांनी केले तर आभार गुडधे यांनी मानले. शिक्षक व नागरिक हजर होते.(तालुका प्रतिनिधी)
दु:खितांच्या चेहऱ्यावरील स्मित हा ईश्वरी आनंद
By admin | Updated: October 19, 2015 02:27 IST