नंदोरी येथील घटना : दोघांना सेवाग्रामला हलविलेहिंगणघाट/ नंदोरी : येथील राष्ट्रीय महार्गावरील नंदोरीजवळ भरधाव इंडिका कार व दुचाकीत धडक झाली. यात दुचाकीवरील तिघे व कारमधील तिघे, असे एकूण सहा गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारार्थ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सेवाग्राम येथे हलविण्यात आले आहे. इमरान खान पठाण व प्रशांत ताळवे अशी त्यांची नावे आहेत. जर महेबुब खान पठाण तिघेही रा. घोडपेठ, भद्रावती याच्यावर हिंगणघाटच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात दुचाकीवरील जखमींना परस्पर सेवाग्राम येथे उपचारार्थ दाखल करण्यात आल्याने त्यांच्याबद्दल विशेष माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातग्रस्त कार नागपूरकडे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
कार-दुचाकी अपघातात सहा गंभीर
By admin | Updated: July 31, 2015 02:12 IST