शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची परिस्थिती शासन बदलविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:55 IST

शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला सावरण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच प्रलंबित सिंचनाच्या योजना हाती घेवून न्यायाची भूमिका घेतली जात आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : बैलजोडी मालकास पुरस्कार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला सावरण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच प्रलंबित सिंचनाच्या योजना हाती घेवून न्यायाची भूमिका घेतली जात आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. स्थानिक मिरणनाथ पटांगणात आयोजित शहरातील ऐकमेव बैल पोळ्यांचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अतिथी म्हणून तहसीलदार प्रदीप वर्पे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी बैलपोळ्यात उत्कृृष्ट ठरलेल्या पाच बैलजोडींचा खासदार तडस यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आला. बैलांचा रंग, शरीर बांधा, सजावट आदी बाबी लक्षात घेवून ही निवड करण्यात आली. प्रथम पुरस्कार विशाल आदमने, द्वितीय सचिन सुरकार, तृतीय गुलाब धोटे, चतुर्थ पिंटू खाडे व पाचवा पुरस्कार विठ्ठल लाडेकर यांचे बैलजोडींना देण्यात आला. शासकीय योजना कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी येथील तहसील कार्यालय कटीबद्ध आहे. बोंडअळीच्या अनुदानासाठी शासनाकडे चोवीस कोटींची मागणी करण्यात आली. यापैकी पहिला हप्ता पाच कोटीचा व दुसरा हप्ता साडेसात कोटीचा मिळाला. अनुदानाचे साडेतेरा कोटी रूपये कास्तकारांच्या खात्यात वळते करण्यात आले. उर्वरित पैसे लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे तहसीलदार वर्पे यांनी सांगितले. प्रास्ताविक सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शरद आदमने यांनी केले. बैलपोळा उत्सवाचे आयोजन सेवा सहकारी सोसायटी व खा. तडस यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे संचालक प्रकाश कारोटकर, संतोष मरघाडे, श्याम घोडे, श्रीकांत येनुरकर, वसंत तरास, सुनील पिपरे, सुरेश तायवाडे, संजय पारिसे, सचिव जे.पी. गोबाडे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसFarmerशेतकरी