शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कानगावच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: December 11, 2014 23:11 IST

बैलाचे शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कानगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस व सभेला अनुपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना गैरहजर

वर्धा : बैलाचे शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कानगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस व सभेला अनुपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना गैरहजर राहण्याच्या कारणाचे सात दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी गाजली. जि.प. अध्यक्ष गैरहजर असल्याने उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी सभेचे अध्यक्षपद भूषवित सभेची सूत्रे सांभाळली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज सर्वसाधारण सभा आयोजित होती. या सभेला जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे या गैरहजर राहणार असल्याचे त्यांनी पूर्वीच कळविले होते. यामुळे उपाध्यक्ष सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेला जिल्हा परिषदेचे सर्वच सदस्य उपस्थित असल्याने विविध विषयावर चर्चा घडून आली. यावेळी विविध विषयावर सूचना करण्यात आल्या. चर्चेदरम्यान कानगाव सर्कलच्या जि.प सदस्य ज्योती देशमुख यांनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात होत असलेल्या अनागोंदीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी येथील एका शेतकऱ्याच्या बैलाच्या मृत्यूचा प्रश्न सभागृहात मांडला. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी टाळाटाळ केली. यामुळे बाहेर गावातून वैद्यकीय अधिकारी बोलावून त्या बैलाचे शवविच्छेदन करावे लागले. यावर सभागृहात चर्चा करून सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याचवेळी सभेला गैरहजर राहण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनी सभाध्यक्षाकडे कुठलीही सूचना दिली नाही. नियमानुसार गैरहजर राहण्याबाबत सूचना करणे बंधनकारक आहे. या विषयावर चर्चा करून गैरहजर असलेल्या सीईओंना सात दिवसात अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत सूचना करण्यात आल्यात.सीईओंच्या गैरहजेरीबाबत सभागृहात चांगलाच वादंग उठला. यावेळी सभेचे सचिव म्हणून उपमुख्यकार्यपालन अधिकारी राजेंद्र भूयार उपस्थित होते. या दोन विषयासह सभेत सदस्यांनी विविध विषय मांडले. सभेला सर्वच विषय समित्यांचे सभापती व अधिकारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)