कार्ड दाखवा रेतीचे वाहन सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:50 PM2017-11-17T22:50:43+5:302017-11-17T22:51:37+5:30

वाळू माफियाला महसूल व पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप होतानाच एका प्रतिष्ठीत व्यावसायीकाचे व्हिजिटींग कार्ड दाखवा अन् वाळू भरलेले वाहन सोडवा ....

Show cards, solve the sand vehicle | कार्ड दाखवा रेतीचे वाहन सोडवा

कार्ड दाखवा रेतीचे वाहन सोडवा

Next
ठळक मुद्देआर्वी तहसीलदाराचा प्रताप : शासनाच्या महसूलाला चूना

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाळू माफियाला महसूल व पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप होतानाच एका प्रतिष्ठीत व्यावसायीकाचे व्हिजिटींग कार्ड दाखवा अन् वाळू भरलेले वाहन सोडवा असा प्रकार शुक्रवारी सकाळी आर्वी-रोहणा मार्गावर घडला. यावेळी रॉयल्टी नसलेली वाळुची वाहने सोडण्यात आली. यातून शासनाच्या महसूलाला चुनाच लागला. या वाळूच्या वाहनांची थेट आर्वीच्या तहसीलदारांनी पाहणी केली हे उल्लेखनिय.
आर्वी तालुक्यातील दर्यापूर रेती घाटाचा नुकताच लिलाव झाला आहे. तेथून दररोज शेकडो रेती भरलेली वाहने क्षमतेपेक्षा अधिक रेती घेवून आर्वी शहरासह परिसरातून जात आहेत. सदर प्रकार गत काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी आर्वी तहसीलच्या चमुनी काही रेती भरलेली वाहने तपासली. या तपासणी पथकात तहसीलदार पवार यांचा समावेश होता. वाळू भरलेल्या वाहनांची तपासणी करताना तहसीलदाराच्या या पथकाने एका व्यक्तीचे व्हिजिटींग कार्ड बघताच वाहने सोडल्याची चर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात आहे. तपासणीदरम्यान वाहनचालकांना रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टीची विचारणा करण्यात आली नाही. यामुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. वर्धा जिल्ह्यात रेती माफियांचा चांगलाच उधम असल्याचे यापूर्वी झालेल्या कारवाईत समोर आले आहे. याला जिल्हा खनिकर्म अधिकाºयांचे ढिलाईचे धोरण जबाबदार आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी चौकशी करणे गरजेचे झाले आहे.
पवार म्हणतात, मला दुसरे कामं आहेत
तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या या कारवाईवर संशयाची ओरड झाली. यामुळे तहसीलदार पवार यांच्याशी संपर्क साधत प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता शुक्रवारी सकाळी आर्वी-रोहणा मार्गावर रेती भरलेल्या वाहनांची तपासणी केल्याचे मान्य केले. परंतु, रॉयल्टी न पाहता व एका व्यक्तीचे व्हिजिटींग कार्ड दाखविण्यावर काही रेती भरलेले मालवाहू सोडल्याचे विचारताच त्यांनी मला दुसरे काम आहे, तुम्हाला ही माहिती कुणी दिली असे म्हणत, बोलण्याचे टाळले.
गत वर्षी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
गत वर्षी आर्वीच्या तहसीलदारांनी अशाच पद्धतीने कारवाई केली होती. त्यावेळी वडगाव (पांडे) १ या घाटावरील कारवाईचा समावेश होता. सदर प्रकार महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारा असल्याने त्याची तक्रार जिल्हाधिकाºयांना करण्यात आली होती. त्यानंतर आर्वीत अशा प्रकारांना काही काळ ब्रेक बसला होता. परंतु, शुक्रवारी पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने जिल्हाधिकाºयांची कारवाई औटघटकेचीच ठरली.

असा प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेण्यात येईल. यावेळी होणाºया चौकशीत कुणी दोषी आढळल्यास त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

Web Title: Show cards, solve the sand vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.