शेतीच्या मशागतीसह करून दिली पेरणीलोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील पावनगाव येथील अल्पभुधारक शेतकरी दशरथ पळसराम तेजने याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्याने या कुटुंबियांवर संकटाचे डोंगरच कोसळले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत व्हावी या उद्देशाने माजी आ. अशोक शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी तेजने यांच्या शेतीची मशागत करीत वहिवारी पेरणी करून दिली.शेतकरी दशरथ यांच्या मागे दोन लहान मुले, वृद्ध वडील व प्रदिर्घ आजारी असलेली पत्नी आहे. दरवर्षी होत असलेली नापिकी व दिवसागणिक वाढत चाललेला कर्जाचा भार त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होत गेली. दरवर्षी बँकेकडून व सावकाराकडून कर्ज घेऊन कुटूंबाच्या कशाबश्या गरजा पूर्ण केल्या जात होत्या. मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, वृद्ध वडीलांची वेळोवेळी बिघडणारी प्रकृती तसेच आजारी असलेल्या पत्नीला असह्य होणाऱ्या वेदना आर्थिक परिस्थिती नाजून असल्याने त्यांना न बघावनारी झाली. डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर व सततची नापिकी याला वैतागून शेवटी दशरथने आपली जीवनयात्रा संपविली. परिणामी, हे कुटूंब उघड्यावर पडण्याची वेळ आली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सहकार्य करावे या उद्देशाने शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अशोक शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी दशरथ तेजने यांच्या घरी जाणून अधिकची माहिती जाणून घेतली असता तेही थक्क झाले. शिवसैनिकंनी तेजने यांच्या कुुटुंबियांना सहकार्य व्हावे या उद्देशाने दशरथच्या पत्नीच्या उपचारासाठी सहकार्य करीत शेतीची मशागत करून वाहीपेरी करून दिली. यावेळी रवींद्र लढी, बाळा जामुनकर, प्रमोद भटे, पं.स.सदस्य गजानन पारखी, गुणवंत कोठेकर, गजानन बोरेकर, सुरेंद्र अराडे, प्रविण धोटे, महेद्र राऊत, नानु पाटील तेजणे, राजू लढी, संजू खोंडे, चिंधू कोठेकर, कुलदिपसिंग गौर, नागोराव वैद्य, कवडू डंभारे, कोल्हे, झगडकर, गजानन तेजने आदी उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शिवसेनेची मदत
By admin | Updated: June 20, 2017 01:10 IST